Pavana River Pollution
Pavana River Pollutionsakal

Pimpri News : पवना-इंद्रायणी नदी सुधारच्या आराखड्यास मंजुरी द्यावी - संदीप वाघेरे

शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
Published on

पिंपरी - पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पास राज्याच्या पर्यावरण समितीची मान्यता म्हणजेच पर्यावरण ना हरकत दाखला तसेच विकास आराखडा अहवाल (डीपीआर) मंजूर करण्याचे साकडे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे घातले आहे.

शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत दोन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाययोजनांची चाचपणी करण्यासाठी ‘मेसर्स एचसीपी डिझाईन लॅनिंग मॅनेजमेंट प्रा.लि.’ या ठेकेदाराची २०१८ मध्ये नेमणूक करण्यात आली होती.

संस्थेच्या वतीने या दोन्ही नद्यांच्या काठच्या विविध ठिकाणांची पाहणी करून नदीपात्रामध्ये मिसळणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून केले जाणारे अनधिकृत भराव व त्यामुळे अरुंद होणारे नदीपात्र याबाबत नदीच्या दोन्ही काठावर असणाऱ्या खासगी व सहकारी जमिनींचा सर्व्हे करून त्याचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

दोन्ही नदीपात्रांचे सर्वेक्षणाच्या आधारावर प्रकल्पासाठी नव्याने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनानुसार महापालिकेच्या वतीने सुमारे दोनशे कोटी रुपयांचे बॉण्ड विकसित करून नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना नदी सुधार प्रकल्पासाठी १५०० कोटी व इंद्रायणी नदी सुधारसाठी १२०० कोटी रुपये निधीची आवश्यकता लागणार आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प गेली नऊ वर्ष रखडलेल्या अवस्थेत आहे. पर्यावरण समितीने पर्यावरण न हरकत दाखला व तयार करण्यात आलेल्या डीपीआर यास सरकारच्या वतीने मंजुरी व प्रकल्पास निधी उपलब्ध झाल्यास शहरातील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे.

- संदीप वाघेरे, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.