कोसळणाऱ्या धबधब्यांनी
प्रवाशांचे मन ओलेचिंब

कोसळणाऱ्या धबधब्यांनी प्रवाशांचे मन ओलेचिंब

Published on

सोमाटणे, ता. ३१ ः संततधार पावसामुळे द्रुतगती मार्गावरील कोसळणारे धबधबे प्रवाशांना वाहनात बसूनच निसर्गाचा आनंद देत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून मावळात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगर उतारावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने सध्या भात खाचरे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे खाचरे ओसंडून पाणी वाहत आहे. खाचरातील पाण्याचा प्रवाह द्रुतगती मार्गालगतच्या उंच खडकावरून प्रवाहित झाल्याने द्रुतगती मार्गालगतचे सर्व धबधबे कोसळत आहेत. मावळात सर्वत्र हिरवेगार डोंगर, त्यावर वाढलेले गवत, धबधबे, असे दृष्य प्रवास करताना अनुभवायला मिळत आहे. अनेक प्रवासी निसर्गाचा मनमुराद आनंद वाहनात बसूनच घेत आहेत.

PNE23T58490

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.