Municipal Elections : लोकसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता - रामदास आठवले
पिंपरी : राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. हे प्रकरण न्यायालयात आहे. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वी डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
संघटना वाढविण्यासाठी ‘आरपीआय’चे मेळावे, बैठका सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील आढावा बैठक आकुर्डीत झाली. यावेळी ते बोलत होते. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर, कुणाल वाव्हळकर, बाळासाहेब भागवत, विलास गरड आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, ‘‘आगामी लोकसभा निवडणूक शिर्डीतून लढविण्यास मी इच्छुक आहे. ही जागा आरपीआयला मिळावी, अशी मागणी भाजपकडे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या ४० जागा निवडून येतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.