देशाच्या अक्षय्य ऊर्जा अभियानात साखर उद्योग आपला ठसा उमटवेल

देशाच्या अक्षय्य ऊर्जा अभियानात साखर उद्योग आपला ठसा उमटवेल

Published on

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा साखर उद्योग कणा
‘को-जनरेशन असोसिएशन’च्या परिषदेत शरद पवार यांचे प्रतिपादन

पिंपरी, ता. १६ : साखर उद्योग हा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा असून, ग्रामीण जनतेच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इथेनॉल, बायो-सीएनजी व हायड्रोजन हे भारताच्या अक्षय्य कार्यक्रमातील नवीन क्षितिज असून, त्यांचा वापर करण्याची क्षमता साखर उद्योगात आहे, असा विश्वास को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता. १६) व्यक्त केले.
को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित ‘साखर कारखाना संकुलांच्या हरित आणि अक्षय्य ऊर्जेसाठी एकात्मिक धोरण’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बायोमासचे सहसचिव दिनेश जगदाळे, दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, पी. आर. पाटील, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन, वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. व्ही. ठोंबरे, हायड्रोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. एस. एस. व्ही. रामकुमार आदी यावेळी उपस्थित होते.
वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे पार पडलेल्या या परिषदेत को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण पवार यांच्या हस्ते पार पडले. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पांना संस्थात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी हायड्रोजन इंडिया या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.
पवार म्हणाले, ‘‘भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा वीज उत्पादक आणि वीज ग्राहक देश आहे. सरकारने नवीन हायड्रोजन धोरण जाहीर केले असून, त्यामध्ये २०२९-३० पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी १९ हजार ७४४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकात्मिक बायोमास एनर्जी प्रोग्रॅमचा समावेश असलेल्या साखर कारखान्यांवर आधारित बगॅस सहनिर्मितीचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे.’’

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सुभाष कुमार व रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता यांनी साखरेसह इतर उत्पादनासंदर्भात जागतिक पटलावर भारताला उपलब्ध असलेल्या संधी याची माहिती दिली. बायोमासचे सहसचिव दिनेश जगदाळे यांनीही मार्गदर्शन केले.
को- जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक संजय खताळ यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढाव घेतला.
फोटोः 68169

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()