kishor Aware
kishor AwareEsakal

Pimpri Crime : किशोर आवारे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी महिनाभरानंतरही फरार

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, अजूनही गुन्ह्यातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार आहे.
Published on

पिंपरी - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु, अजूनही गुन्ह्यातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे हा फरार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आणखी एका पथकाची स्थापना केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी यापूर्वी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे.

किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), श्याम अरुण निगडकर (रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे, आदेश विठ्ठल धोत्रे (रा. नाणे, ता. मावळ), संदीप ऊर्फ नन्या विठ्ठल मोरे ( रा. आकुर्डी), श्रीनिवास ऊर्फ सिनू व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी भानू खळदे अद्याप फरार आहे.

किशोर आवारे यांच्या हत्येमुळे मावळ परिसरात राजकीय वाद विकोपाला गेला आहे. काहीजण खुनाच्या घटनेत राजकारण होत असल्याचा आरोप करीत आहेत. तर, काहीजण वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या झाल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यातील मुख्य आरोपी भानू खळदे लवकर सापडणे, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.

kishor Aware
Sakal Vidya : बारावीनंतर कुठे घ्यायचा प्रवेश? ‘सकाळ’तर्फे उद्या करिअरबाबत मार्गदर्शन, शंकांचे होणार निरसन

पोलिसांच्या प्राथमिक तपासातील अंदाज

बांधकाम प्रकल्पासमोरील झाडे बेकायदेशीरीत्या तोडल्याच्या संशयावरून किशोर आवारे आणि भानू खळदे यांचा मागील वर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयात वाद झाला. यामध्ये किशोर आवारे यांनी भानू खळदे याच्या कानशिलात लगावली. या रागातून भानू खळदे याचा मुलगा गौरव याने किशोर आवारे यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून १२ मे रोजी दुपारी चार जणांनी किशोर आवारे यांच्यावर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हल्ला करून, त्यांची हत्या केली, असा पोलिसांचा आत्तापर्यंतच्या तपासातील प्राथमिक अंदाज आहे.

kishor Aware
Sakal Vidya Edu Expo : करिअरबाबत विद्यार्थी, पालकांना ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत मार्गदर्शन

‘किशोर आवारे प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीचा कार्यभार सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच, गुन्हे शाखेची दोन पथके तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आली असून, ‘एसआयटी’ला अन्य एका पथकाची जोड देण्यात आली आहे.

- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.