pmpl bus
pmpl bussakal

PMPL : उपनगरे विकसित; मात्र ताथवडे, पुनावळे परिसरामध्ये प्रवाशांची होतेय गैरसोय

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे, पुनावळे हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मात्र, या भागात ये-जा करण्यासाठी आवश्‍यक बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
Published on

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे, पुनावळे हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. मात्र, या भागात ये-जा करण्यासाठी आवश्‍यक बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या भागात नवीन बस सुरु करण्याबरोबरच, सुरु असणाऱ्या बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

पुनावळे, ताथवडे, मामुर्डी या भागांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत काही वर्षापूर्वी समावेश झाला आहे. रोजगाराची उपलब्धता, नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प, मोठे रस्ते, शिक्षणाच्या संधी यामुळे या उपनगरांमधील लोकसंख्या वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरेशी सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात ‘पीएमपीएल’ प्रशासन अपयशी ठरले आहे. येथील नागरिक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.

ताथवडे, पुनावळे या भागांमध्ये अनेक महाविद्यालये आहेत. पिंपरी चिंचवड शहराबरोबरच पुण्यातूनही अनेक विद्यार्थी या भागात शिक्षणासाठी रोज बसने प्रवास करतात पण या महाविद्यालयांच्या परिसरात एकही बस थांबा नाही. भूमकर चौकातून महाविद्यालयापर्यंत पायी जावे लागत असल्याची तक्रार रोज येथून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.

 pmpl bus
Hinjewadi News : वाकड-हिंजवडीच्या सुपुत्रांकडून खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वी

पुण्यातून केवळ महापालिका येथून बसची सोय आहे. कात्रज ते वडगाव मावळला जाणाऱ्या बसचा पुनावळे येथे थांबा आहे. मात्र, या बसची वारंवारता कमी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून या परिसरात एकही बस उपलब्ध नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

बसचे नवीन मार्ग सुरु करण्याची मागणी झाल्यास, त्याबाबत सर्वेक्षण करून निर्णय घेतला जाईल, असं पीएमपीएमएल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘चिंचवड ते ताथवडे या मार्गावर एकही थेट बस उपलब्ध नाही. त्यामुळे इकडे यायचे झाल्यास भूमकर चौकात उतरून यावे लागते. जर बसही वेळेत मिळाली नाही तर ओला किंवा उबेर वापरण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, तो जास्त खर्चिक आहे.

- गणेश दुधे, रहिवासी, ताथवडे

 pmpl bus
Property Tax : मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी पिंपरी महापालिकेचा आटापिटा

‘या भागात किवळे बस टर्मिनस व भूमकर चौक या दोनच बस थांब्यावर शहराच्या इतर भागातून बस ये जा करतात. या बसची संख्याही मोजकीच आहे. भूमकर चौकातून कॉलेजपर्यंत यायचे झाल्यास रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. येथे रिक्षाला मीटरपद्धती नाही. त्यामुळे रिक्षावाले नेहमीच जास्त दर आकारतात. जे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या परिसरात नवीन बस सुरु होणे गरजेचे आहे.

- विक्रम खाडे, विद्यार्थी

‘चिंचवड ते भूमकर चौकापर्यंत अनेक बस सुरु आहेत. आकुर्डी, निगडी ते किवळे टर्मिनसपर्यंतही बस सुरु आहेत. भविष्यात जर नवीन मार्गांची मागणी आली तर त्याचा विचार केला जाईल.

- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.