Borewell
BorewellSakal

Water Level : बोअरवेल आटल्या; पाणीपातळी खालावली

उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खोल गेली असल्याने अनेक भागातील बोअरवेल आटल्या आहेत.
Published on

पिंपरी - उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खोल गेली असल्याने अनेक भागातील बोअरवेल आटल्या आहेत. त्यामुळे काही सोसायट्यांनी टॅंकरची संख्या वाढवली असून काहींनी पाण्याचे नियोजन करून पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचे नियोजन केले आहे. मोठ्या सोसायट्यांना पाणी प्रश्न तीव्रतेने जाणवत असून छोट्या व महापालिकेचा पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायट्यांना फारसा प्रश्न भेडसावत नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये गेल्या दहा वर्षात सर्वाधिक गृहनिर्माण सोसायट्या झाल्या आहेत. त्यामध्ये दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव, मोशी, चिखली, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी या गावांचा समावेश होतो. या भागात आयटीयन्स व नोकरदारांची संख्या सर्वाधिक आहे.

अगदी पन्नास सदनिकांपासून पाचशे सदनिकांपर्यंत सोसायट्या आहेत. त्यामुळे त्यांना मागणीनुसार पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. महापालिकेचे पाणी पुरत नसल्याने काही सोसायट्यांनी बोअरवेल घेतल्या असून काहींनी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. मात्र, सध्या उन्हाळा व लांबलेला पावसाळा यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. परिणामी अनेक बोअरवेलचे पाणी कमी झाले असून काही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन गरजेसाठी सोसायट्यांना पाण्याचे नियोजन करावे लागत आहे.

Borewell
Hinjewadi News : वाकड-हिंजवडीच्या सुपुत्रांकडून खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वी

‘आमच्या तीन बोअरवेल आहेत. त्यातील एक आटली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं आहे. वापरासाठी त्याचं पाणी वापरतो. पिण्यासाठी महापालिकेचे पाणी असते. सकाळ व सायंकाळी प्रत्येकी तीन तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतो. वापरायचे व पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा केली आहे. परंतु, सध्याची पाणीस्थिती पाहता तीनऐवजी दोन्ही वेळा केवळ दोनच तास पाणीपुरवठा करण्याचे विचाराधीन आहे.’

- चारुहास कुलकर्णी, सल्लागार, गणेश रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर

‘आमच्या सोसायटीत २४८ फ्लॅट आहेत. बिल्डरने बांधकामासाठी केलेल्या दोन व नंतर रहिवाशांसाठी केलेल्या तीन अशा पाच बोअरवेल होते. त्या सर्वच बंद आहेत. पाण्यासाठी महापालिकेचे सहकार्य मिळत नाही. पाण्याची गरज भागवण्यासाठी मार्च व एप्रिल महिन्यात प्रतिदिन नऊ टॅंकर मागवत होतो. आता गरजेनुसार एक-दोन टॅंकर जादा मागवावे लागतात.’

- हरिओम सिंग, खजिनदार, आरमाडा सोसायटी, वाकड

Borewell
PMPL : उपनगरे विकसित; मात्र ताथवडे, पुनावळे परिसरामध्ये प्रवाशांची होतेय गैरसोय

‘आमची सोसायटी २० फ्लॅटची आहे. तातडीची उपाययोजना म्हणून एक बोअर घेतला आहे. पण, महापालिकेचे पाणी दिवसाआड असले तरी पुरेसे मिळते. तेच आम्ही पुरवून वापरत आहोत. त्यामुळे टॅंकर मागविण्याची आवश्यकता आतापर्यंत कधी वाटली नाही. प्रत्येक फ्लॅटमध्ये २४ तास पाण्याची व्यवस्था आहे. पण, पाणी जपून वापरण्याची सूचना सर्वांना दिल्या आहेत. पाण्याचे नियोजन करून वापर केला जात आहे.’

- गजेंद्र पवार, खजिनदार, शिवमुग्धा रेसिडेन्सी, बोऱ्हाडेवाडी, मोशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()