MLA Anna Bansode
MLA Anna BansodeSakal

Pimpri News : राष्ट्रवादी-भाजपात अस्वस्थता; मुख्यमंत्री व आमदार बनसोडे यांच्या भेटीचा परिणाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ‘राष्ट्रवादी’चे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीबरोबरच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली.
Published on

पिंपरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ‘राष्ट्रवादी’चे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीबरोबरच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. बनसोडे यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे.

बनसोडे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळविताना संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी सुरवातीला माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. धर यांची उमेदवारी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली होती.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या आग्रहामुळे बनसोडे यांना रात्रीत पुन्हा दुसरा बी फॉर्म बनसोडे यांना देण्यात आला होता. बनसोडे यांनी सकाळी लवकर जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून बनसोडे ओळखले जातात. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना अजित पवार यांच्याबरोबर बंड केलेले बहुतांश आमदार माघारी फिरले होते.

परंतु; बनसोडे हे अजित पवार यांच्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत होते. परंतु; एका प्रकरणात राज्यात सत्ता असताना एका पोलिस अधिकाऱ्याने बनसोडे यांचे काम न केल्याने व मागील अडीच वर्षात मंत्रिपदीही वर्णी न लागल्याने ते पक्षावर नाराज होते.

बनसोडे वारंवार नाराज

बनसोडे यांनी पक्षावरील आपली नाराजी वारंवार दाखवली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत त्यांच्या गाडीतून मंत्रालय ते ठाणे असा प्रवास केला होता. या प्रवासाचा व्हिडीओही ‘व्हायरल’ झाला होता.

त्यावेळी व आत्ताही भेटीनंतर बनसोडे यांनी माध्यमांशी बोलताना आपण मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असे सांगितले. परंतु; या भेटीमागे राजकीय घडामोड असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही बनसोडे यांच्याबाबत नाराजी आहे.

भाजपमध्येही अस्वस्थता

शिवसेनेशी सलगी वाढून मुख्यमंत्री शिंदे यांच्यामार्फत अण्णा बनसोडे यांना आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपमध्येही अस्वस्थता आहे.

भाजपच्यावतीने सध्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने पक्ष संघटन बांधणीचे काम जोमात सुरु आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातही बूथ बांधणीच्या बैठका व मेळावे सुरु आहेत.

MLA Anna Bansode
Digital Hoarding : पिंपरी शहरात पुन्हा नव्याने अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज उभी राहू लागली

‘भाजपचे नेते आदेश देतील, ते आम्ही पाळू. मात्र, आमच्याच मित्र पक्षाने आमदार बनसोडे यांना उमेदवारी दिल्यास व त्यांनी निवडणूक लढल्यास आमच्या काम करण्याच्या मानसिकतेचा विचार पक्ष करेल का?’, अशा भावना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

- अमित गोरखे, प्रभारी, भाजप, पिंपरी विधानसभा मतदारसंघ.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. मतदारसंघातील कामे असतात. मुख्यमंत्र्यांकडून कामे करून घ्यायची असतात. त्यामुळे त्यांच्या ते संपर्कात असतात. आमदार अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत व पक्षाचे एकनिष्ठ आहेत. अजित पवार यांच्या ते संपर्कात आहेत.

- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.