PCMC मधील वाहतूक कोंडी सुटणार, रक्षक चौकासंदर्भात महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

PCMC मधील वाहतूक कोंडी सुटणार, रक्षक चौकासंदर्भात महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

Pune PCMC Traffic Issue: बहुतांश आयटीयन्सही याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते
Published on

Rakshak Chowk PCMC News

पिंपरी : सांगवी फाटा ते रावेत बीआरटीएस मार्गावर पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौकात भुयारी मार्ग (सब-वे) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर होणारी कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.

PCMC मधील वाहतूक कोंडी सुटणार, रक्षक चौकासंदर्भात महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय
Pune Air Pollution : प्रदूषित हवेपासून घ्या काळजी; गुणवत्ता ढासळली; रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे

सांगवी आणि औंध जोडणाऱ्या मुळा नदीवरील राजीव गांधी पुलापासून रावेत-किवळे बीआरटी मार्ग सुरू होतो. या रस्त्याचे दहा वर्षांपूर्वी महापालिकेने रुंदीकरण करून बीआरटी मार्गिका, मुख्य मार्ग व सेवा रस्ता निर्माण केला. त्यानंतर गेल्या दोन वर्षातच पदपथांसह सायकल मार्ग उभारून कडेला वृक्षारोपण करून सुशोभीकरणही केले आहे. पुढे या रस्त्याने वाय जंक्शन येथून वाकड, हिंजवडी, मुंबई-बंगळूर महामार्गाला जाता येते. साई चौकातून (जगताप डेअरी चौक) वाकड, पिंपळे सौदागर, पिंपरी, पुणे-मुंबई व पुणे-नाशिक महामार्गावर जाता येते. काळेवाडी फाटा येथून वाकड व काळेवाडी, चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि डांगे चौक थेरगाव येथून चिंचवड, वाल्हेकरवाडी मार्गे प्राधिकरणात जाता येते. शिवाय, ताथवडे, पुनावळे, रावेत हा नव्याने विकसित भागही या रस्त्याने जोडला गेला आहे. शिवाय, पिंपळे निलखमधून बाणेर, बालेवाडी भागातही जाता येते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. बहुतांश आयटीयन्सही याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढून रक्षक सोसायटी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

असा आहे चौक
सांगवी-रावेत बीआरटी मार्गावर रक्षक चौक आहे. संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेली रक्षक सोसायटी चौकातून पिंपळे निलखकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूस आहे. सांगवीकडून रावेतकडे जाताना डाव्या बाजूस लष्कराचा औंध कॅम्प आहे. त्याचे प्रवेशद्वारही चौकालगतच आहे. तेथून पुढे काही मीटर अंतरावर वाकड फाटा आहे. तो वाय जंक्शन म्हणून प्रसिद्ध आहे. तेथून बंगळूर महामार्ग व आयटी पार्क हिंजवडीला जाता येते. रक्षक चौकातून पिंपळे निलख गावठाण मार्गे बाणेरला जाण्यासाठी रस्ता आहे.

PCMC मधील वाहतूक कोंडी सुटणार, रक्षक चौकासंदर्भात महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय
Pune News : लोणीकंद, हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बदली

अशी झाली प्रक्रिया
पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते गावठाणात संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारा रस्ता १८ मीटर रुंद आहे. हा दुहेरी मार्ग असून मध्ये दुभाजक आहे. दोन्ही बाजून पदपथ असून संरक्षक भिंत आहे. या १८ मीटर रस्त्यास सब-वे (भुयारी मार्ग) उभारण्यासाठी सात कोटी ६२ लाख आठ हजार २१३ रुपये दराची निविदा प्रक्रिया महापालिकेने राबवली होती. सर्वात कमी पाच कोटी ७३ लाख १० हजार ८०६ रुपये दराची निविदा एचसी कटारिया कंपनीची होती. त्यांच्याशी करारनामा करण्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिल्याने सब-वे उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘‘सांगवी-रावेत बीआरटी मार्गावर रहदारी वाढली आहे. रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सब-वे उभारण्याचे नियोजन आहे. रक्षक चौक ते पिंपळे निलख रस्त्यावर सब-वे उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल.’’
- मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()