marathi for elite status central govt
marathi for elite status central govtSakal

Marathi Language Elite Status: मराठीला ‘अभिजात’चा दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी द्या, पंतप्रधानांकडे केली मागणी

दिरंगाई करणाऱ्या संस्कृती विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच लवकरात लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.
Published on

पिंपरी, ता. १९ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचे इतिवृत्त केंद्र सरकारच्या भारतीय साहित्य अकादमी यांच्याकडून संस्कृती विभागाकडे सादर होऊनही संस्कृती विभागाकडून या प्रस्तावास मंजुरी देण्यास दिरंगाई होत आहे. तरी या प्रस्तावास संस्कृती विभागाने तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सूरज बाबर यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व संस्कृती मंत्रालयाकडे केली आहे.


निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे, यासंबंधी भारतीय साहित्य अकादमी यांचा ईमेल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये मराठी भाषेच्या संदर्भात अकादमीने भाषिक तज्ज्ञांच्या समितीच्या दोन बैठका यापूर्वीच घेतल्या असून, या बैठकांचे इतिवृत्त भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नाही. तरी दिरंगाई करणाऱ्या संस्कृती विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच लवकरात लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.