बोडके वस्ती रस्त्यावर राडारोडा; शेतकऱ्यांची गैरसोय

बोडके वस्ती रस्त्यावर राडारोडा; शेतकऱ्यांची गैरसोय

Published on

सोमाटणे, ता.२९ ः संरक्षण विभागाने खोदलेल्या जलवाहिनीतील राडारोडा रस्त्यावर तसाच ठेवल्याने गहुंजे स्टेडियम मार्गे बोडकेवस्तीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
गेल्या महिन्यात संरक्षण विभागाने जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी व नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी गहुंजे क्रिकेट स्टेडियमलगतचा वाघजाई माता व बोडके वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खोदकाम केले होते. हे खोदकाम करताना त्यात निघालेला राडारोडा, दगड, माती रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत टाकले होते. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा रोडारोडा संरक्षण विभागाने रस्त्यावरून हटवणे गरजेचे होते. परंतु, एक महिना उलटूनही काहीच कार्यवाही केली नाही. नागरिकांची रस्त्याची ही गैरसोय विचारात घेऊन संबंधित विभागाने रस्त्यावरचा हा राडारोडा तातडीने हलवावा, अशी मागणी गहुंजे ग्रामस्थांनी केली आहे.
सोमनाथ बोडके म्हणाले,‘‘सध्या राडारोडा रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंत पडून असल्याने बोडके वस्तीकडे व वाघजाई मातेकडे जाणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने घरापर्यंत नेताना मोठी कसरत करावी लागते. हा प्रकार संरक्षण विभागाने केल्याने तक्रार कोणाकडे करायची ? ते आपले म्हणणे ऐकतील का ? या विचाराने अद्याप कोणीही तक्रार केली नाही.’’

PNE24U05249

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.