Wari Timetable: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे २८ जूनला प्रस्थान, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!
देहू, ता.२५ ः ‘‘आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता.२८) जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पायी वारीत संस्थानच्यावतीने पर्यावरण संरक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा तसेच प्रदूषण मुक्त वारी, हरित वारी आणि स्वच्छ वारीचा संदेश दिला जाणार आहे,’’ अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
माणिक महाराज मोरे म्हणाले, ‘‘यंदा ३३९ वा पालखी सोहळा आहे. शुक्रवारी (ता.२८) ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखी सोहळ्याचे देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पहिल्या दिवशी पालखी सोहळा देहूतील इनामदारवाड्यात मुक्कामी आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात नव्याने ६७ दिंड्यांची वाढ झाली असून एकूण चारशे दिंड्या या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.’’
पालखी सोहळ्यातील मुक्कामाची ठिकाणे पुढीलप्रमाणे -
- २९ जूनला आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्काम.
- ३० जूनला पहाटे पालखी सोहळ्याचे पिंपरीतील एच.ए.मैदान, कासारवाडी, शिवाजीनगरमार्गे पुण्यातील नानापेठ येथील विठ्ठल मंदिरात आगमन.
- १ जुलैला नाना पेठ येथे सोहळ्याचा संपूर्ण दिवसभर मुक्काम.
- २ जुलैला लोणीकाळभोर येथील कदम वाक वस्तीवर मुक्काम.
- ३ जुलैला यवत येथील भैरवनाथ मंदिरात मुक्काम.
- ४ जुलैला वरवंड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोहळा मुक्कामी.
- ५ जुलैला उडंवडी गवळ्याची येथे सोहळा मुक्कामासाठी असेल.
- ६ जुलैला बारामती येथील शारदा विद्यालयाच्या पटांगणात मुक्कामी असेल.
- ७ जुलैला पालखी सोहळा सणसर येथील पालखी तळावर मुक्कामाला असेल.
- ८ जुलैला बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण झाल्यावर पालखी सोहळ्याचा आंथुर्णेला मुक्काम.
- ९ जुलैला निमगाव केतकी येथे पालखी तळावर मुक्कामी असेल.
- १० जुलैला इंदापूर येथे पालखी तळावर सोहळ्याचा मुक्काम राहील.
- ११ जुलैला सराटी येथे मुक्कामी पोहोचेल.
- १२ जुलैला अकलूज माने विद्यालयात मुक्काम.
- १३ जुलैला माळीनगरचे पहिले उभे रिंगण झाल्यावर बोरगावला मुक्काम.
- १४ जुलैला पिराची कुरोली येथे मुक्काम.
- १५ जुलैला वाखरी तळावर मुक्काम.
- १६ जुलैला उभे रिंगण झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरातील संत तुकाराम महाराज मंदिराच्या नवीन इमारतीत मुक्कामी असेल.
- १७ जुलैला आषाढी वारी दिवशी नगर प्रदक्षिणा होईल.
- २१ जुलैच्या दुपारपर्यंत पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान (मंदिर) नवीन इमारत, प्रदक्षिणा मार्ग येथे मुक्कामी असेल.
- त्यानंतर, सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.