नाटकांची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध

नाटकांची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध

Published on

सकाळ नाट्यमहोत्सव ः लोगो

पिंपरी, ता. २९ ः अक्षयतृतीयेनिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित नाट्य महोत्सवाचे आता ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध आहेत. महोत्सवामध्ये भाऊ कदम, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, ओंकार भोजने, काजल काटे, प्रिया करमरकर, अमोल कुलकर्णी आदी कलाकारांचा आविष्कार बघायला मिळणार आहे.
सध्या उन्हाळा सुरू आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. विरंगुळा म्हणून कुटुंबीयांसह फिरायला जायचं म्हटलं तर प्रचंड ऊन आहे. अशावेळी मन ताजंतवानं करणारं साधनं म्हणजे नाटक आणि चित्रपट. यातील नाटकांची आणि जोडीला कधी मनाला रुंजी घालणाऱ्या तर कधी खळखळून हसविणाऱ्या कवितांचा हलका-फुलका कार्यक्रम १० ते १२ मे दरम्यान ही मेजवानी सर्वांना उपलब्ध होणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘सकाळ नाट्य महोत्सव’ आयोजित केला आहे. त्याअंतर्गत ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा निखळ मनोरंजनाचा हलका-फुलका प्रयोग १० मे रोजी होईल. ११ मे रोजी ‘तू म्हणशील तसं!’ आणि १२ मे रोजी ‘करून गेलो गाव’ ही नाटकं होतील. संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत दिली जाणार आहे. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आहे. ऑनलाइन बुकिंग उपलब्ध आहे.

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)
सीझन तिकीट (तळमजला) ः १००० रुपये
सीझन तिकीट (बाल्कनी) ः ८०० रुपये
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) ः ४०० रुपये
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) ः ३०० रुपये

महोत्सवाचे वेळापत्रक
शुक्रवार (ता. १०) : संकर्षण व्हाया स्पृहा
शनिवार (ता. ११) : तू म्हणशील तसं!
रविवार (ता. १२) : करून गेलो गाव

नाट्य बुकींगसाठी...
ऑनलाइन बुकिंग ः https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app
फोन बुकिंग ः ८९७५२३७०४१
अधिक माहितीसाठी संपर्क ः सचिन ः ९७३०९५९६९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.