हरित शहरासाठी अभिप्राय पाठवा!

हरित शहरासाठी अभिप्राय पाठवा!
Published on

पिंपरी, ता. २६ ः शहराच्या शाश्वत विकासासाठी महापालिका शहर धोरण २०३० च्या अनुषंगाने ‘हरित शहर कृती आराखडा’ तयार करीत आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धनासह हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण; हरितीकरण, जैवविविधता, घनकचरा, आरोग्य, वाहतूक, एनर्जी कार्बन एमिशन, क्लायमेट चेंज सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इकोसिस्टीम, ग्रीन बिल्डींग, नदी व जलस्रोत पुनरुज्जीवन आदी घटकांचा विचार केला जाणार आहे. या उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, आपले अभिप्राय आठ ऑगस्टपर्यंत कळवावेत, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
महापालिका लवकरच हरित शहर कृती आराखडा तयार करणार आहे. यामध्ये पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक गोष्टींचा तपशील असेल. या उपक्रमात आयएफसीच्या (APEX) ऑनलाइन सॉफ्टवेअर टूलचा वापर करून केलेल्या हरित शहर मूल्यांकनातील निष्कर्षांचा समावेश असेल. हे सॉफ्टवेअर कार्बन बचत, ऊर्जा बचत आणि खर्च यावर आधारित हरित शहर कृती ओळखण्यात, मूल्यांकन करण्यात आणि प्राधान्य देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट इमारती, ऊर्जा, वाहतूक, कचरा आणि पाणी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हरित गुंतवणूक करण्याचा आहे.

अभिप्राय नोंदवा, सहभाग घ्या
हरित शहर कृती आराखड्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/green-city-action-plan.php या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी. https://forms.gle/mbCCsBzirecWwKEh6 या लिंकवर जाऊन गुगल फॉर्ममध्ये आपला अभिप्राय नोंदवावा. तसेच, cto@pcmcindia.gov.in या मेल आयडीवरही अभिप्राय पाठवू शकता. अभिप्राय नोंदविण्याची अंतिम मुदत आठ ऑगस्ट २०२४ आहे.

शहर धोरणाची गरज का?
- शहरात येणाऱ्या नागरिकांमुळे लोकसंख्या सातत्याने वाढत आहे
- शाश्वत विकास करताना पर्यावरणपूरक गोष्टींचा अंतर्भाव गरजेचा
- नागरिकांमध्ये शाश्वत विकास आणि हवामानाबाबत जागरूकता
- कृती आराखडा सर्वांचा सहभाग व एकसंध दृष्टिकोन आवश्यक
- गुंतवणूक व समस्यांवरील उपायांची अंमलबजावणी आवश्यक
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com