Maval Loksabha
Maval Loksabhasakal

Maval Loksabha : मावळात बारणेंची हॅटट्रिक की वाघेरेंचा करिष्मा?

मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण? याचे उत्तर मंगळवारी (ता. ४) दुपारपर्यंत मिळणार आहे. मात्र, मतदारसंघ निर्मितीपासून आजपर्यंतच्या तीन निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत. आताही शिवसेना रिंगणात आहे.
Published on

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण? याचे उत्तर मंगळवारी (ता. ४) दुपारपर्यंत मिळणार आहे. मात्र, मतदारसंघ निर्मितीपासून आजपर्यंतच्या तीन निवडणुका शिवसेनेने जिंकल्या आहेत. आताही शिवसेना रिंगणात आहे. मात्र, मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध नव्याने स्थापन झालेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात लढत झाली आहे.

निवडणुकीदरम्यान घडलेली महत्त्वाची समीकरणे
महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्याबाबत...
- २०१९ च्या निवडणुकीतील विरोधक अजित पवार आता २०२४ च्या निवडणुकीत भाजपबरोबरची महायुती म्हणून श्रीरंग बारणे यांच्यासोबत
- भारतीय जनता पक्षाचे २०१४ व २०१९ च्या निवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीचे साथीदार आमदार लक्ष्मण जगताप यांची निधनामुळे उणीव
- केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, याच हेतूने भाजपचे आमदार, कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते बारणे यांच्यासोबत
- २०१९ च्या निवडणुकीत विरोधात प्रचार केलेले राष्ट्रवादीचे आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी अजित पवार यांच्यामुळे बारणे यांच्यासोबत

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी बारणे यांना उमेदवारी दिल्याने ते हॅट्‍ट्रिक साधणार? की २००९, २०१४ व २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार जिंकून ते जागा राखणार? याची उत्सुकता लागली आहे. या निकालामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर मतदारांचा कौल कोणाला? याचेही उत्तर मिळणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ २००८ मध्ये अस्तित्वात आला. २००९ मध्ये पहिली निवडणूक झाली. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीतील जागा वाटपात शिवसेनेच्या वाटेला मावळ मतदारसंघ आला. तेव्हापासून त्यात बदल झाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये निवडणूक झाली. त्यांचे उमेदवार गजानन बाबर विजयी झाले. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत ठाकरे यांनी बाबर यांच्याऐवजी श्रीरंग बारणे यांना संधी दिली आणि ते निवडून आले. २०१९ मध्येही बारणे यांनाच संधी मिळाली आणि त्यात त्यांनी बाजी मारली. आता ते तिसऱ्यांदा रिंगणात होते. मात्र, त्यांचे नेतृत्व बदलले होते. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली होती.

बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर शिवसेना कोणाची? असा वाद न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे गेला. त्यात शिंदे यांनी न्यायालयीन लढाई जिंकली आणि त्यांना शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाले. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नवीन नाव व चिन्ह सुचविण्यास आयोगाने सांगितले होते. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षाची आयोगाकडे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’ अशी झाली. त्यांना मशाल चिन्ह मिळाले. या पक्षाच्या नावाने व चिन्हावरच त्यांनी आताची २०२४ ची निवडणूक लढवली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून पक्षात आलेले संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली. शिवाय, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केली आहे. बारणे हे तिसऱ्यांदा रिंगणात असून, २०१४ व २०१९ प्रमाणे त्यांचा पक्ष शिवसेना व चिन्ह धनुष्यबाणच होते. त्यामुळे ते हॅट्‍ट्रिक साधणार की, ठाकरे यांचा करिष्मा दिसणार? याबाबत उत्सुकता आहे.

महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्याबाबत...
- २०१९ च्या निवडणुकीत विरोधात असलेले माजी मंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे व कॉंग्रेस पक्ष यांच्याशी उद्धव ठाकरे यांची आघाडी
- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारलेले संजोग वाघेरे यांना पक्षात घेऊन ठाकरे यांच्याकडून उमेदवारी
- राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर साथ सोडून गेलेले संजोग वाघेरे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते
- २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केलेले भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी एक माजी नगरसेवक महाविकास आघाडीमुळे वाघेरे यांच्यासोबत
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()