Ganpati Decoration
Ganpati DecorationGanpati Decoration, Ganesh Chaturthi 2024, Ganesh Festival 2024, Ganpati Festival 2024

Ganpati Festival 2024: सजावटीचा ट्रेंडही सोशल मीडियाकडून ‘हायजॅक’

Pimpri Chinchwad Ganpati News: घरोघरी, बाजारांमध्ये, मंडळांमध्ये, ढोलपथकांमध्ये फक्त आणि फक्त गणरायाच्या आगमनाची चर्चा आहे. हेच वातावरण आम्ही आपल्यापर्यंत पोचविणारी ‘आले गणराय’ वृत्तमालिका
Published on

Pimpri Chinchwad Latest News

पिंपरी : घरातील अबालवृद्धांचा आवडता गणेशोत्सव आता अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव म्हणजे उत्साह, आनंद व चैतन्याचा सण..गणपतीच्या स्वागताची घरोघरी तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, सुटीचा दिवस पाहून खरेदीही केली जात आहे.

Ganpati Decoration
Shree Jyotiba Temple Kolhapur श्री केदारनाथांनी रवळनाथ हे नाव का धारण केले?

गणपतीच्या सजावटीमध्ये सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते ते मखराला. त्यानंतर फुलांची सजावट, रोषणाईचे दिवे यांचा विचार केला जातो. मूर्तीचा आकार व रंगसंगतीला साजेसे मखर घेण्यासाठी सध्या बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. सोशल मीडियावरील रील्सनुसार सजावट करण्याचा ट्रेंड सध्या गणेशोत्सवात दिसत आहे. त्यामुळे मखरांची निवड करण्यासाठीही सोशल मीडियाचाच आधार ग्राहक घेत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ग्राहकांच्या ही मागणी लक्षात घेता विविध आकार, रंगसंगतीमधील मखरांबरोबरच, मखर तयार करण्याच्या रिंग, फ्रेम सध्या बाजारात दाखल झाले आहे. (Ganpati Decoration items in Pune)

सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार मागणी
गणेशोत्सवाची सजावट कशी करावी, पर्यावरणपूरक मखर कसे करावे याचे रील्स गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीपासूनच सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे रील्स पाहून त्यानुसार मखर किंवा संबंधित साहित्य खरेदी करण्याकडे गणेशभक्तांचा कल आहे. त्यासाठी लोखंडी व लाकड्याच्या फ्रेम, रिंग, बॅकड्रॉप यांना मोठी मागणी आहे. मखरासाठी अगदी तीन फुटांपासून ते सहा फुटांपर्यंतच्या फ्रेम चौकोनी, गोल, लंबाकृती या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. त्याची किंमत ६०० रुपयांपासून पुढे आहे. या फ्रेम टिकाऊ असून, त्यावर फुले, कापड, माळा यांची आपल्या आवडीप्रमाणे सजावट करता येते. वापरल्यानंतर त्याचे भाग सुटे करून ठेवता येतात. त्यामुळे पुढील कितीतरी वर्ष त्याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या फ्रेमला विशेष मागणी आहे. (Ganesh Murti Decoration Ideas)

Ganpati Decoration
12 Jyotirlingas of Lord Shiva: 12 पैकी किती ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत?

मंदिरे व झोपाळ्यांनाही मागणी
सध्या धकाधकीच्या जीवनात हवी तशी सजावट करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तयार मंदिरे घेणाऱ्या ग्राहकांचीही संख्या मोठी आहे. फोम, एमडीएफ लाकूड, फायबर यापासून बनवलेल्या मंदिरांना व मखरांना सध्या मागणी आहे. यामध्ये अष्टविनायक, राममंदिर, विठ्ठलाची प्रतिकृती असलेली मंदिरे, तसेच फुलांची आरास केलेली मखरे, फायबरमधील एलइडी लाइट असलेली मखरे यांना सध्या बाजारात मागणी आहे. विविधरंगी लेस, माळा व कृत्रिम फुलांनी सजविलेले विविध आकारातील झोपाळेही खरेदी केले जात आहेत. सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या आकारातील मंदिरांची खरेदी केली जाते. त्यामुळे अगदी दोन फुटांपासून ते सहा फुटांपर्यंतची मखरे बाजारात पाहायला मिळत आहेत. ज्याची किंमत पाचशे ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे.

‘‘सोशल मीडियावरील व्हिडिओ व रील्स पाहून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे तयार मंदिरे व मखरांपेक्षा धातू व लाकडाच्या फ्रेम यांना जास्त मागणी आहे. कृत्रिम फुलांच्या माळा लावलेल्या विविध आकारातील फ्रेमही नागरिक खरेदी करत आहेत.’
- जय वनवारी, मखर विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...