pimpri crime
pimpri crime

Pimpri Crime: मला जो कोणी नडणार.. पिस्तूल हवेत फिरवत पिंपरीत गुंडांची दहशत

गणेश ऊर्फ मॅड भुंगा कांबळे (वय २१, रा. निराधारनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर तौफिक ऊर्फ तौफया चांद शेख (वय १८, रा. बालामल चाळ, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, तो फरार आहे.
Published on

पिंपरी, ता. १ : ‘मला जो कोणी नडणार, त्याची सुट्टी नाही’, ‘इथले भाई आम्हीच, आमच्याकडे हत्यार आहे,’ असे म्हणत हवेत पिस्तूल फिरवत दोन गुंडांनी पिंपरीतील निराधारनगर परिसरात दहशत माजवली. यातील एक गुंड तडीपार असतानाही हद्दीत आला होता.

गणेश ऊर्फ मॅड भुंगा कांबळे (वय २१, रा. निराधारनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर तौफिक ऊर्फ तौफया चांद शेख (वय १८, रा. बालामल चाळ, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, तो फरार आहे. गणेश कांबळे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो तौफिक याच्यासह निराधारनगर येथे आला होता. पिस्तूल हवेत फिरवून आरडाओरडा करीत दोघांनी दहशत माजवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...