My Fried Sriganesha Quiz Contest winners
My Fried Sriganesha Quiz Contest winnerssakal

My Fried Sriganesha Quiz Contest : चांदीची आभूषणे देऊन विजेत्यांचा केला गौरव

गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण.
Published on

पिंपरी - सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचे चांगले- वाईट परिणामही दिसू लागले आहेत. तो जितका सुखकारक आहे, तितकाच दुःखदायकही आहे. त्यामुळे मोबाईल वापराबाबत प्रबोधन करण्यासाठी आणि लाडक्या गणपतीची महती वाचकांना कळावी, यासाठी ‘सकाळ’ने माय फ्रेंड श्रीगणेशा प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती.

चिंचवडच्या भारती माने यांनी प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट पटकाविला. द्वितीय क्रमांक विजेती चिंचवडची लब्धी कोठारी हिने ‘चांदीचा हार’ आणि तृतीय क्रमांकाचा विजेता भोसरीच्या राजवीर लांडगे याला ‘चांदीची समई’ देण्यात आली.

काळेवाडीतील रागा पॅलेसमध्ये गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. यावेळी ‘होय महाराजा’, डिलिव्हरी बॉय’, ‘गर्ल्स’ फेम सिनेअभिनेत्री डॉ. अंकिता लांडे, अधिरा इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ ढवळे, अलार्ड युनिव्हर्सिटीचे सचिव रामा यादव, रिद्धी कलेक्शनचे संचालक वंदना देवगिरीकर, व्यंकटेश देवगिरीकर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

‘सकाळ’चे जाहिरात विभागाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद भुजबळ उपस्थित होते. स्पर्धेतून शंभर विजेत्यांची नावे सोडत ( ड्रॉ) पद्धतीने काढले होते. सर्व विजेत्यांना श्रीगणेशाची आभूषणे असलेल्या चांदीच्या वस्तू देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात पीतांबर लोहार यांनी ‘माय फ्रेंड गणेशा’ पुरवणीच्या कामाची संकल्पना मांडली. विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक जयंत जाधव यांनी आभार मानले.

‘माय फ्रेंड गणेशा’ ला १० वर्षे पूर्ण

‘सकाळ’ वाचकांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या १० वर्षांपासून ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ पुरवणी प्रसिद्ध केली जात आहे. तिला मिळणारा प्रतिसाद म्हणजे वाचकांनी ‘सकाळ’वर व्यक्त केलेले प्रेम आणि विश्‍वास आहे. यंदा ‘माय फ्रेंड गणेशा’ पुरवणीला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.

मुलांनी वाचनाकडे प्राधान्य देणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, कारण अति तेथे माती असते. आजची पिढी वाचन केले, तर वाचणार आहे.

- डॉ. अंकिता लांडे, सिनेअभिनेत्री

मी ‘सकाळ’ची वाचक आहे. ‘सकाळ’मध्ये वाचकांच्या ज्ञानात भर पडणारी माहिती असते. ‘माय फ्रेंड गणेशा’ ही पुरवणी म्हणजे गणेशाच्या भक्तीचा मार्ग आहे. पुरवणीमधील माहिती खूप उपयुक्त आहे.

- भारती माने, प्रथम विजेती

गणेशोत्सवात आयोजित वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडते. त्यातून खूप शिकायलाही मिळते. ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत मागील तीन-चार वर्षांपासून सहभाग घेत आहे. यंदा मला बाप्पा पावला आहे. मी खूप खूष आहे.

- लब्धी कोठारी, द्वितीय विजेती

‘माय फ्रेंड गणेशा’ पुरवणीमध्ये गणपतीच्या विविध नावांची माहिती मिळाली. गणपती ही विघ्नहर्ता देवता आहे. त्याच्या आराधनेमुळे एक ऊर्जा मिळते. गणपती बाप्पा मला आवडतो. त्याची आरती म्हणायला आवडते.

- राजवीर लांडगे, तृतीय विजेता

मुलांनी मोबाईलच्या वापरापासून दूर राहणे आवश्‍यक आहे. सकाळच्‍या माय फ्रेंड गणेशा’ पुरवणीचे वाचन मुलांनी केले पाहिजे.

- नवनाथ ढवळे, अधिरा इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.