माजी आमदार भेगडे मतदानापासून वंचित

माजी आमदार भेगडे मतदानापासून वंचित

Published on

तळेगाव दाभाडे, ता.१३ ः मतदार यादीत नाव नसणे, चुकीची नावे अशा अनेक चुकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्यासह अन्य काही मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले. त्यामुळे, निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 
तळेगाव दाभाडे शहरात ६० मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी होती. मात्र, दुपारी उन्हामुळे गर्दी कमी झाली होती. शहरात ५९ हजार ३४६ मतदार आहेत. राजकीय विरोधक एकमेकांच्या गळ्यात हात घालून पहिल्यांदाच  महायुतीच्या बुथवर दिसून आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बुथवरही कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मतदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.