Pandurang Bodake, Ram Gomare and Sachin Wakadkar
Pandurang Bodake, Ram Gomare and Sachin WakadkarSakal

Hinjewadi News : वाकड-हिंजवडीच्या सुपुत्रांकडून खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वी

दक्षिण आफ्रिकेत १९२१ पासून अव्याहतपणे सुरू असलेली, जगातील सर्वात जुनी, लांब पल्ल्याची व अतिशय कठीण अशी ९० किमी अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’
Published on

हिंजवडी - दक्षिण आफ्रिकेत १९२१ पासून अव्याहतपणे सुरू असलेली, जगातील सर्वात जुनी, लांब पल्ल्याची व अतिशय कठीण अशी ९० किमी अंतराची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ आयर्न मॅन असलेल्या वाकड-हिंजवडीच्या तिघा सुपुत्रांनी यशस्वीपणे पूर्ण करत फिनिशर्सचे पदक पटकाविले. या यशामुळे शहरातून या तिघांचे कौतुक होत आहे.

आयटी नगरी माण, बोडकेवाडीचे पांडुरंग बोडके (९ तास ५२ मिनिटे १५ सेकंद), हिंजवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे (११ तास १७ मिनिटे ५६ सेकंद), वाकडचे सुपुत्र व फिटनेस आयकॉन सचिन वाकडकर (११ तास ४१ मिनिटे ४० सेकंद) यांनी ही धाडसी कर्तबगारी करून दाखवली आहे. कॉम्रेड मॅरेथॉन ही दक्षिण आफ्रिका देशात भरवली जाणारी अल्ट्रा मॅरेथॉन आहे. पहाटे साडे पाचला ही मॅरेथॉन सुरू होते, सायंकाळी साडे पाचला ती पूर्ण करायची असते. यात जगभरातील ५० लाखांहून अधिक जलतरणपटू सहभागी होत असतात.

यावर्षी पीटरमेरिट्झबर्ग ते डर्बन असा उणे चार अंश सेल्शियश तापमानात, कोवाईज हिल, फेल्ड्स हिल, बोथास हिल, इंचांगा आणि पॉली शॉर्टस या पाच खडतर पर्वतरांगाचा प्रवास, डोंगर-दऱ्यातून जाणारा अवघड मार्ग, तीव्र उतार-चढ, नागमोडी वळणे, तसेच इतर अनेक लहान टेकड्यांचा सामना करत १२ तासांच्या आत ९० किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे आव्हान होते. मात्र, प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर या तिघांनी ही मॅरेथॉन वेळेच्या अगोदर पूर्ण करत देशाचा तिरंगा साता समुद्रापार फडकविला आहे.

Pandurang Bodake, Ram Gomare and Sachin Wakadkar
Shikshak Bharti: राष्ट्रहितासाठी तरी शिक्षक भरती करा! केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांचा राज्यांना सल्ला

यावर्षी पीटरमेरिट्झबर्ग ते डर्बन असा उणे चार अंश सेल्शियश तापमानात, कोवाईज हिल, फेल्ड्स हिल, बोथास हिल, इंचांगा आणि पॉली शॉर्टस या पाच खडतर पर्वतरांगाचा प्रवास, डोंगर-दऱ्यातून जाणारा अवघड मार्ग, तीव्र उतार-चढ, नागमोडी वळणे, तसेच इतर अनेक लहान टेकड्यांचा सामना करत १२ तासांच्या आत ९० किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे आव्हान होते. मात्र, प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर या तिघांनी ही मॅरेथॉन वेळेच्या अगोदर पूर्ण करत देशाचा तिरंगा साता समुद्रापार फडकविला आहे.

Pandurang Bodake, Ram Gomare and Sachin Wakadkar
Pune Crime : लष्करी गणवेश परिधान करून फसवणूक करणाऱ्या तोतया सुभेदारास अटक

एडीजी कृष्ण प्रकाश यांच्यासोबत स्पर्धेची तयारी करताना फायदा झाला. कोच दादासो सत्रे यांनी प्रॅक्टिसवर बारकाईने निरीक्षण करून अनेक बदल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर व माझ्या सर्व वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याचे राम गोमारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तर पांडुरंग बोडके व सचिन वाकडकर यांना प्रशिक्षक शिव यादव यांनी मार्गदर्शन केले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनीही या तिघांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.