वाकड - ताथवडे-पुनावळे अंडरपासच्या चहुबाजुला अवतरलेल्या हजारो सदनिकांचे भव्य गृहप्रकल्प, वर्षभरात वास्तव्यास आलेल्या रहिवाशांचा प्रचंड उद्रेक त्यात महामार्गावर माइनिंगचे सुरू असलेले काम यामुळे ताथवडे-पुनवळे सेवा रस्ता आणि अंडरपासमध्ये वाहनाच्या रांगा लागत आहेत. सोमवारी (ता. १८) रात्री आठच्या सुमारास कोंडीचा सामना सर्वांना करावा लागला.
या सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. वाकड वाहतूक पोलीस देखील सर्वतोपरी प्रयत्न करतात मात्र, कधी-कधी या कोंडीला आवरणे त्यांनाही अवघड जाते. सकाळी नऊ ते अकरा, दुपारी एक ते दोन व सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत म्हणजेच शाळा, कॉलेजेस, आयटी पार्क व लहान मोठ्या कंपन्या सुटण्याच्या वेळेस सर्वांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्गवर कामामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने सेवा रस्त्यावर ताण येत आहे.
ताथवडे आणि पुनावळे अंडरपाच्या आजूबाजूला झालेल्या असंख्य मोठ्या गृहप्रकल्पात रहिवासी वास्तव्यास आले आहेत त्यामुळे त्यांचाही या वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. परिसराचा कायापालट झालेला असताना गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे अवस्थेत असलेले येथील मुंबई-बंगळूरु महामार्गावरी भुयारीमार्ग वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. महामार्ग प्रशासनाने भुयारी मार्गाची उंची वाढवून या समस्येतून सर्वांची सुटका करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिक्रिया
महामार्ग प्रशासनाकडून महामार्गावर माईनिंगचे काम सुरू आहे. आम्ही पीक आवरमध्ये काम करण्यास मनाई केली आहे. मात्र, सुरु असलेल्या कामामुळे महामार्गावर कोंडीत अडकू नये म्हणून सर्वजण सर्रास सेवा रस्त्याचा अवलंब करत असल्याने कोंडी होत आहे. दोन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात आहेत.
- सुनिल पिंजन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.