भोसरी-आळंदी रस्त्याने जाताय? वाचा सविस्तर बातमी

The traffic police took an important decision to avoid a traffic jam on Alandi Road
The traffic police took an important decision to avoid a traffic jam on Alandi Road
Updated on

भोसरी : भोसरी पोलिस वाहतूक विभागाद्वारे भोसरीतील आळंदी रस्त्याने येणाऱ्या वाहनांना भोसरी-आळंदी रस्ता चौकातून चाकणच्या दिशेला जाण्यासाठी बंदी घातली आहे. आळंदी रस्त्याने येणाऱ्या वाहनांना मोशी-चाकणकडे जाण्यासाठी पीएमटी चौकातील राजमाता जिजाऊ उड्डाण पूलाखालून यू-टर्न घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या चौकासह आळंदी रस्त्यावर होणाऱ्या नेहमीच्या वाहतूक कोंडीतून भोसरीकरांची सूटका होणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरीतील भोसरी-आळंदी रस्ता चौकात आळंदी, दिघी, मोशी, चाकण, येरवडा, पुणे, खेड, पिंपरी-चिंचवड आदी भागांकडे जाणारी वाहने ये-जा करतात. वाहनांच्या प्रचंड संख्येच्या तुलनेत चौकातील रस्ते अरुंद आहेत. आळंदी रस्त्याने येणारी वाहने चाकण, मोशी, खेडकडे जाण्यासाठी या चौकातून वळण घेतात. मात्र, चौकातून आळंदी रस्त्याकडे जाणाऱ्या इतर वाहनांमुळे आळंदी रस्त्याकडून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा मार्ग अडवला जातो.  त्याचप्रमाणे इतर ठिकाणी वळत असलेल्या वाहनांमुळेही या चौकात नेहमीच वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळते. या चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आळंदी रस्त्या पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर तासन तास वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र असते. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्याने ये-जा करणे नेहमीच संतापजनक होत होते. ही समस्या विचारात घेऊन भोसरी वाहतूक पोलिसांद्वारे आळंदी रस्त्याकडून येणाऱ्या व  मोशी-चाकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बंदी घालून त्यांना पीएमटी चौकातून यू-टर्न घेऊन वळावे लागणार आहे. आळंदी रस्त्यावरील वाहतूक विना थांबा पुढे सुरू राहून आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सूटका होणार आहे.

या विषयी नगरसेवक सागर गवळी यांनी सांगितले, की ''आळंदी रस्त्यावर नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडीविषयी भोसरी वाहतूक पोलिसांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे नागरिकांची मतेही जाणून घेतली होती. यातून मार्ग काढून या चौकातील आळंदी रस्त्याने येणारी वाहतूक पीएमटी चौकातून पुढे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमध्ये आज 797 रुग्ण कोरोनामुक्त, तर एवढ्या जणांना लागण

''आळंदी रस्त्यासह भोसरी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पीएमपीचा बस थांबा पुन्हा पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील जुन्या ठिकाणी हलविण्यात आला. उड्डाणपूलाखालील या जागेतून आळंदी रस्त्याने येणारी वाहने वळविण्यात आली. त्यामुळे आळंदी रस्त्याने येणारी वाहने वाहतूक नियंत्रक दिव्यांच्या अडथळ्याशिवाय पुढे जाणार आहेत. भोसरीतील भोसरी-दिघी रस्त्यावरही  पुण्याकडून येणारी वाहने दिघी रस्त्याकडे न पाठवता त्यांना भोसरी-आळंदी चौकातून यू टर्न घेण्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे.''
-शिवाजी गवारे, वरिष्ट पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.