Pimpri-Chinchwad News : बॉयलरबाबत प्रशासन अनभिज्ञ प्रशासकीय यंत्रणांकडे नोंदच नाही; औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर

शहरात यापूर्वी भोसरी-लांडेवाडी, भोसरी एमआयडीसी जी-ब्लॉक आदी ठिकाणच्या रासायनिक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन, जीवितहानी झाली आहे.
chemical company
chemical companysakal
Updated on

पिंपरी: जागतिक स्तरावर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. शहरासह परिसरातील चाकण, तळेगाव, हिंजवडी, उर्से अशा औद्योगिक पट्ट्यांत कंपन्यांमधील बॉयलर किती, याबाबत महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालयाकडे नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डोंबिवलीसारखी बॉयलर स्फोटाची परिस्थिती उद्भवल्यास जबाबदार कोण? मदतकार्य कसे पोहोचणार? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

शहरात यापूर्वी भोसरी-लांडेवाडी, भोसरी एमआयडीसी जी-ब्लॉक आदी ठिकाणच्या रासायनिक कंपन्यांमध्ये स्फोट होऊन, जीवितहानी झाली आहे. शिवाय, वेगवेगळ्या कारणांनी आग लागून तळवडे ज्योतिबानगर, वाल्हेकरवाडी, कुदळवाडी आदी भागातही जीवित व वित्त हानी झाली आहे. शहरात लघुउद्योगांसह बहुराज्य व बहुराष्ट्रीय कंपन्याही आहेत.

त्यात बॉयलर उत्पादक कंपन्यांही आहेत. बॉयलर असलेल्या किती कंपन्या आहेत? याचा आढावा डोंबिवलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला असता, त्याबाबतचे वास्तव समोर आले. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत बॉयलरच्या स्फोटात सात जणांचा बळी गेला.

शहर परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बॉयलर कंपन्यांची नोंदच महापालिका अग्निशमन विभाग, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालयाकडे नसल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकडे किती गांभीर्याने पाहते?, हे स्पष्ट होते.

कंपन्यांना अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र एमआयडीसी देते. त्यामुळे आपल्याकडे नोंद नसते. केवळ आग लागल्यानंतर सुरक्षा यंत्रणा म्हणून आपण तिथे पोहोचतो. शिवाय एमआयडीसीचे एकही अग्निशमन केंद्र शहरात नाही.

- मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग, महापालिका

बॉयलर कंपन्यांसंदर्भातील माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असते. आमच्याकडे त्यासंदर्भात नोंद नाही. यंत्रसामग्री संदर्भातील नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असते. त्यामुळे त्यासंदर्भातील माहिती एमआयडीसीकडेच मिळू शकेल.

- नितीन वानखेडे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

पिंपरी-चिंचवडमध्ये किती बॉयलर कंपन्या आहेत, याचा निश्चित आकडा सांगता येणार नाही. बॉयलर कंपन्यांच्या नोंदीसाठी स्वतंत्र विभाग असतो. फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून बॉयलरचे परीक्षण केले जाते. त्यांच्याकडे माहिती मिळू शकेल.

- मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ

chemical company
Pimpri Online Fraud : ऑनलाइन फसवणूक; विविध बँक खात्यांवर तब्बल ५० कोटींचे व्यवहार, दोघे अटकेत

बॉयलर कंपन्यांसाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यांच्याकडेच नोंद होत असते. त्यामुळे अशा कंपन्यांची नोंद आमच्याकडे नाही. पिंपरी-चिंचवडमधील बॉयलर कंपन्यांबाबत अग्निशमन विभागाकडे माहिती मिळू शकेल.

- संजय गिरी, सहसंचालक, औद्योगिक स्वास्थ्य व सुरक्षा संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.