Police Recruitment : सख्ख्या भावा-बहिणीची पोलिस भरतीत एकाच वेळी निवड; आईच्या आनंदाला ‘भरते’

लहानपणीच वडिलांचा छत्र हरपल्यानंतर आईसमवेत मामांच्या गावात राहून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या दोघा भावंडांची पोलिस भरतीत एकाच वेळी निवड झाली.
Abhishek kajale and sanika kajale
Abhishek kajale and sanika kajalesakal
Updated on

वडगाव मावळ - लहानपणीच वडिलांचा छत्र हरपल्यानंतर आईसमवेत मामांच्या गावात राहून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या दोघा भावंडांची पोलिस भरतीत एकाच वेळी निवड झाली. मावळातील साते गावात राहणाऱ्या या भावंडांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर जन्मदात्या आईला आनंदाचे जणू भरते आले आहे.

मुंबई पोलिस शिपाई पदाचा नुकताच निकाल लागला असून, सातेतील सानिका मारुती काजळे व अभिषेक मारुती काजळे या सख्ख्या बहीण-भावाने बाजी मारली. अभिषेक आणि सानिका यांच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांचे वडील मारुती काजळे यांचे सानिका लहान असतानाच निधन झाले. कुस्ती क्षेत्रात त्यांचे नाव होते तसेच पोहण्यात ते तरबेज होते. आई गावातील एका पोल्ट्रीमध्ये काम करत आहे. हे कुटुंब मुळचे चिखलसे गावचे पण लहानपणापासून साते गावात मामाकडे राहायला आहे.

दोघांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साते येथे पूर्ण झाले. अभिषेकने नवनीत करियर अकादमी (कामशेत) येथे तर सानिकाने शौर्य अकादमी (वडगाव) येथे पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेतले. सातत्य, अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न या पंचसूत्रीच्या जोरावर या दोघांनी यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही आई वंदना काजळे तसेच मामा अनंता आगळमे यांनी त्यांना कशाची कमी पडू नाही दिली. शिक्षणाबरोबर संस्कारही दिले.

Abhishek kajale and sanika kajale
Hording : पुणे शहरासह ग्रामीण भागातही होर्डिंग मृत्यूचे सापळे

साते गावातील ओंकार भुंडे यानेही पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. त्यामुळे गावाला मोठा आनंद झाला. गावात शिवव्याख्याते अशी त्याची ओळख आहे. तसेच ब्राह्मणवाडी येथील स्वप्निल पवार यांचीही मुंबई पोलिसपदी निवड झाली. गेल्या महिन्यात मोहितेवाडी येथील नागेश मोहिते याची पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड झाली या सर्वांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

या मुलांनी ऐतिहासिक साते गावच्या वैभवात भर घातली आहे. यापुढील काळातही गावातील विद्यार्थी अशाच सरकारी परीक्षा देतील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी बनतील.

- तुकाराम आगळमे, सामाजिक कार्यकर्ते

पतीच्या निधनानंतर आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडल्या. माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी जात आहेत याचा मला अभिमान वाटतो. माझ्या कष्टाचे सार्थक झाले.

- वंदना काजळे, साते

या यशाचे श्रेय मी माझ्या आईला देतो. त्याचप्रमाणे माझ्या सर्व गुरुजनांचाही माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. आयटीमधील नोकरी सोडून देशसेवा करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

- अभिषेक काजळे, साते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.