Vandebharat :वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात जाण्याची चिंता, तिकीट दर कमी होणार ?

रेल्वे प्रवासी संघाकडून महाप्रबंधकांना मागणीचे पत्र
'वंदे भारत' ट्रेन
'वंदे भारत' ट्रेनSakal
Updated on

पिंपरी : प्रवाशांच्या कमी प्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर तोटा भरून काढण्यासाठी पुणे-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला मासिक पास सुविधा उपलब्ध करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी रेल्वे महाप्रबंधक यांच्याकडे केली आहे.

रेल्वे महाप्रबंधकांना दिलेल्या निवेदनात मुलाणी यांनी म्हटले आहे की, मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससह देशातील अन्य ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ना प्रवाशांचा कमी प्रतिसाद लाभत आहे. चाळीस टक्क्यांहून अधिक सीट रिकाम्या राहत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांतून समजले आहे.

'वंदे भारत' ट्रेन
Pune: पूर्व भागावर अन्याय का?, कार्यकर्त्यांचा पोलिसांना सवाल; गणेशोत्सव बैठक

या महत्वाकांक्षी गाडीचा प्रवास आरामदायक व सुविधायुक्त असला तरी तिचे तिकीट दर अन्य एक्स्प्रेस व सुपरफास्टच्या गाड्याच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. शिवाय, तिचा वेगही अन्य रेल्वे इतकाच असल्याने वेळेत फारशी बचत होत नाही. या कारणांमुळे आता प्रवाशांनी वंदे भारत एक्स्प्रेसकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.

'वंदे भारत' ट्रेन
Sambhaji Nagar: हॅलो तुमचा मुलगा शाळेत का येत नाही?, महापालिका शाळांतील शिक्षकांचे फोन...

प्रवाशांनी पाठ फिरवल्याने वंदे भारत एक्स्प्रेस तोट्यात जाण्याची रास्त चिंता रेल्वे प्रशासनाला पडली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आता देशातील सर्वच वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी करण्याचा विचार करीत आहे.

या पार्श्वभूमीवर, पुणे-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला योग्य दरात मासिक पास सुविधा सुरू केल्यास, प्रवाशांची कमतरता भरून निघण्यास मदत होईल व दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.