आळंदी/पिंपरी - महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान संचलित मोशीतील वेदश्री तपोवन संस्थेतील ७१ विद्यार्थी नारळी पौर्णिमेनिमित्त इंद्रायणी नदीवर स्नानासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडू लागले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. अन्य एक विद्यार्थी बेपत्ता आहे. डुडुळगाव येथील हवालदार वस्तीजवळ सोमवारी (ता. १९) सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.