Pimpri Vehicles No Entry : दंड भरू; पण नो एंट्रीतूनच जाऊ! ‘राँग साइड, तरीही सुसाट’

नो एंट्री तसेच राँग साइडने वाहन घुसडल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
Vehicles in No Entry
Vehicles in No Entrysakal
Updated on

पिंपरी - नो एंट्री तसेच राँग साइडने वाहन घुसडल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, याबाबत ‘सकाळ’ने २७ जूनला ‘राँग साइड, तरीही सुसाट’ या शीर्षकाखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले.

यानंतर नो एंट्रीतून वाहन नेणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत ५१ हजार १८४ वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ४ कोटी ६० लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागत नसल्याचे कारवाईवरून समोर येते. ‘दंड भरू, पण नो एंट्री’तून जाऊ, अशी मानसिकता या बेशिस्त वाहनचालकांची झाल्याचे दिसून येते.

बीआरटी मार्गिकेत खासगी वाहनांना मनाई असतानाही सोमवारी (ता. २९) बीआरटी मार्गिकेतून धावणाऱ्या स्कूल बस व मोटारीची समोरासमोर धडक झाली. या गंभीर घटनेत स्कूल बसमधील दोन विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान, पुणे- नाशिक महामार्गासह शहरातील विविध मार्गावरील नो एंट्रीतून तसेच विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांबाबत तसेच त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत ‘सकाळ’ सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे वाहतूक विभागाने मोठ्याप्रमाणात कारवाई सुरू केली.

आयुक्तयालयांर्तगत असलेल्या विविध वाहतूक विभागांच्या हद्दीत कारवाईची मोहीम राबवत बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाई केली. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

मोटारचालक व बसचालकावर गुन्हा दाखल

चिंचवड ऑटो क्लस्टरजवळील बीआरटी मार्गिकेत सोमवारी (ता. २९) झालेल्या स्कूल बस व मोटार अपघातप्रकरणी पिंपरी पोलिसांनी मोटार व बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. मोटारचालक यश अरुण मित्तल (वय २९, रा. भेळ चौक, प्राधिकरण, निगडी) व पोदार इंटर नॅशनल स्कूल बसवरील चालक योगेश एकनाथ खोडके (वय२८, रा. शास्त्री चौक, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहनांना परवानगी नसतानादेखील स्कूल बसचालक व मोटारचालकाने हयगयीने व भरधाव वेगाने वाहन चालविल्याने त्यांची समोरासमोर धडक झाली. बसचालक घोडके याने बीआरटी मार्गकेतून वाहन चालवल्यास परवानगी नसताना या मार्गिकेतून बस चालवली.

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली असून रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले अाहेत. अद्याप अहवाल प्राप्त झाला नसून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.

सात महिन्यांतील कारवाई

  • नो एंट्रीतून वाहन नेणाऱ्या वाहन चालकांवर जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत ५१ हजार १८४ जणांवर कारवाई करून तब्बल चार कोटी ६० लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

  • रॉंग साईडने येणाऱ्या तीन हजार ३५९ कारवाई

विशेष मोहीम

  • नो एंट्रीतून तसेच विरुद्ध दिशेने वाहन घुसडल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघात होत असल्याने अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी २८ जुलै ते ६ ऑगस्ट २०२४ या आठ दिवसांत विशेष मोहीम राबवली जात आहे. याबाबत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.