पुणे : आयटीयन्सला दिलेले ‘वर्क फ्रॉम होम’ व स्थानिक ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे कोलमडलेले आर्थिक गणित, या कारणांमुळे शहरातील आयटी पार्कमधील आयटीयन्सवर अवलंबून असलेले सुमारे ७० टक्के हॉटेल अजूनही बंद आहेत, तर ज्यांनी व्यवसाय सुरू केला तेही पूर्ण क्षमेतेने हॉटेल खुले करण्याचा धोका टाळत आहेत.
शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्यानंतर हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण, खराडी, हडपसर, विमाननगरसह आयटी पार्कमधील नोकरदारांना ‘वर्क फ्रॉम होम’ दिले. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरूच ठेवले. त्यामुळे आयटीयन्सचे हॉटेलला जाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी, हा वर्ग ग्राहक असलेल्या अनेक चालकांनी त्यांचे हॉटेल किंवा रेस्टॉरंट सुरू केले नाही.
हॉटेल सुरू झाल्यानंतर ते चालविण्यासाठी आवश्यक असलेला खर्च भागेल की नाही. तसेच, ग्राहकांचा किती प्रतिसाद मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे हॉटेल सुरू करूनही ग्राहक न आल्याने होणारे आर्थिक नुकसान नको म्हणून ते बंद ठेवलेले बरे, अशी मानसिकता या व्यावसायिकांत निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका आयटी पार्कच्या आत असलेल्या हॉटेलांना बसला आहे.
तर हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील हायवेवर असलेले हॉटेल मात्र सुरू झाले आहेत. कारण त्यांना आयटीकडून प्रतिसाद मिळत नसला, तरी हायवेवरील गर्दीमुळे त्यांचा व्यवसाय सुरू आहे.
कोरोनामुळे हॉटेल बंद केल्याचे परिणाम अजूनही अनेक व्यवसायिकांना सोसावे लागत आहे. आयटी पार्कमध्ये आणि त्याच परिसरातील स्थानिक ग्राहक कमी प्रमाणात असलेले सुमारे ३० टक्के हॉटेल अद्याप बंद आहेत, तर ज्यांनी सुरू केले तेही पूर्ण क्षमतेने व्यवसाय करीत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आयटी पार्क पूर्णतः सुरू होत नाही, तोपर्यंत तेथील व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू होणे अवघड आहे.
- गणेश शेट्टी,
अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलियर्स असोसिएशन
हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतरही आयटी परिसरातील अनेक हॉटेल बंद आहेत. मीदेखील हॉटेल सुरू केले नाही. कारण ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर आणखी आर्थिक फटका सहन करावा लागेल. आयटी कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथील हॉटेल सुरू होतील.
- नील शेट्टी, हॉटेल व्यावसायिक, हिंजवडी
सद्यःस्थिती काय?
आयटी पार्कमधील हॉटेलांची संख्या सुमारे ४००
सध्या सुरू असलेल्या हॉटेल
३० टक्के
आयटी पार्कमधील हायवे परिसरातील हॉटेल सुरू
पूर्णतः आयटीयन्सवर अवलंबून असलेल्यांना मोठा फटका
आयटी पार्क पूर्ववत सुरू झाल्यास परिस्थिती सुधारणार
या परिसरातील हॉटेलांवर परिणाम
हिंजवडी
बाणेर
बालेवाडी
पाषाण
खराडी
हडपसर
विमाननगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.