Wakad Crime : घटस्फोटासाठी पत्नीचा मोटारीत डांबून छळ; भुलीचे दिले इंजेक्शन

घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कराव्यात म्हणून पतीनेच पत्नीला ऑफिसपासून मोटारीपर्यंत बळजबरीने फरफटत नेले.
Crime
Crimesakal
Updated on

वाकड - घटस्फोटाच्या पेपरवर सह्या कराव्यात म्हणून पतीनेच पत्नीला ऑफिसपासून मोटारीपर्यंत बळजबरीने फरफटत नेले. दोन दिवस भुलीचे वारंवार इंजेक्शन देत मोटारीत डांबून ठेवले. मारहाण करून छळ केला. वटपौर्णिमेच्या दिवशी वाकडमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पती आणि चुलत दिराला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी वाकड पोलिसांत पीडित महिलेने फिर्याद दिली असून शुक्रवारी (ता. २१) रात्री उशिरा महिलेचा पती सुमीत दिलीप शहाणे, सासू पिंगळा दिलीप शहाणे व पतीचा चुलत भाऊ विक्रांत (रा. सर्वजण मुळेवाडी, मंचर, आंबेगाव) या तिघांविरुद्ध वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुमीत व विक्रांत यांना भोसरीतून अटक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याचे आपापसांत पटत नसल्याने ते एकत्र राहत नव्हते. फिर्यादी सुरूवातीला मामाकडे पुण्यात राहत होत्या. त्यानंतर, त्या घाटकोपर व तिथून दिल्लीत राहायला गेल्या.

काही महिन्यानंतर, वाकडमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाकडे त्यांनी नोकरी सुरू केली. त्याचा सुगावा लागताच सुमीत याने १९ जूनला दुपारी आई व चालकासोबत पत्नीचे ऑफिस गाठले. ‘घटस्फोटाच्या पेपरवर सही कर आणि परत ये’, असे म्हणत पत्नीला फरपटत नेत मोटारीत बसवले.

सायंकाळी मंचरजवळील म्हाळुंगे पडवळ येथे पोहोचताच सुमीतने पत्नीला भुलीचे इंजेक्शन दिले. थेट घरी न जाता रात्रभर मोटारीत डांबून ठेवले. या दरम्यान ती शुद्धीवर आली की, तो वारंवार भुलीच इंजेक्शन द्यायचा आणि सही करण्यासाठी बळजबरी करायचा, असे पत्नीने जबाबात म्हटले आहे.

अशी केली स्वतःची सुटका

पत्नीने सुमीतला विश्वासात घेत सांगेल त्या कागदपत्रांवर सही करते, असे सांगितल्यावर सुमीतने गाडी मंचर परिसरात आणली. मात्र, माझी भूल अद्याप उतरली नाही, असा बहाणा तिने केला. मग ते मंदिरात थांबून राहिले. त्यावेळी पत्नीने एका तरुणास खुणावत, पोलिस मदतीची मागणी केली. तिथे मंचर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिस मंदिरात पोहोचले अन्‌ पत्नीची सुमीतच्या तावडीतून सुटका झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.