Sakal Impact : तब्बल वीस वर्षांनी मिळाला रहिवाशांना डांबरी रस्ता

शेवटचे टोक असल्याने विनोदे वस्ती येथील रॉयल कॅसल सोसायटी परिसर या भागावर सर्वांचेच दुर्लक्ष होते. अखेर सकाळच्या पाठपुराव्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करुन देत रहिवाशांची गैरसोय दूर केली आहे.
Road Development
Road DevelopmentSakal
Updated on

वाकड - येथील रॉयल कॅसल सर्व्हे नंबर ७५/१७५/२ हा सुमारे पंधरा सोसायट्यांचा वाकड-हिंजवडीच्या सीमेवर असलेला वाकड हद्दीतील परिसर. शेवटचे टोक असल्याने या भागावर सर्वांचेच दुर्लक्ष होते अखेर सकाळच्या पाठपुराव्यानंतर या परिसरात जाणाऱ्या एकमेव रस्त्याचे डांबरीकरण महापालिका प्रशासनाने करुन देत पावसाळ्यापूर्वी रहिवाशांची गैरसोय दूर केली आहे.

वाकड- हिंजवडी हद्दीलगत व विनोदेनगर येथील रॉयल कॅसेल सोसायटी परिसरातील सुमारे पंधरा सोसायट्या असून दोन हजार नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र वाकडचे शेवटचे टोक म्हणून हा भाग कायम दुर्लक्षित होता. वीस वर्षांपासून या भागासाठी असलेल्या एकमेव रस्त्याचे डांबरीकरण करून पक्क्या रस्त्यात रूपांतर होऊ न शकल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असे या दुर्लक्षित भागावर सकाळने प्रकाश टाकत यंदा तरी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करा या आशयाखाली सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल घेत माजी शिवसेना गटनेते व नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून या भागाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी त्यांनी आग्रह केल्याने दोन दिवसात खडी, क्रशसँडचे तीन लेयर अंथरून डांबरीकरण करण्यात आले आहे. वीस वर्षांत पहिल्यांदाच पक्का रस्ता मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत सकाळचे आभार मानले. रस्ता पक्का होण्यासाठी रहिवाशी संतोष जाधव यांनी सर्वांच्या वतीने सकाळ व महापालिका प्रशासनाशी सातात्याने पाठपुरावा केला होता.

Road Development
Hinjewadi News : वाकड-हिंजवडीच्या सुपुत्रांकडून खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ यशस्वी

प्रतिक्रिया

पंधरा सोसायटी, एक हॉस्पिटल व इंग्रजी माध्यमाची शाळा या छोट्याशा पट्ट्यात आहे. सुमारे दोन हजार लोक येथे वास्तव्यास आहेत. आजवर एकमेव रस्ता देखील कच्चा होता मात्र, सकाळने यावर प्रकाश टाकला आणि माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी गांभीर्य ओळखत तत्परतेने डांबरीकरणासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने आम्हाला पक्का रस्ता मिळाला तो ही केवळ सकाळ मुळेच

- संतोष जाधव, रहिवाशी रॉयल कॅसल सोसायटी

मुळात हा रस्ता नॉन डीपीत असल्याने अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे डांबरीकरण होऊ शकले नाही. मात्र, रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात रहिवाशांची कसरत होऊ नये, मुलांना शाळेत सोडताना व घेऊन जाताना पालकांना त्रास होऊ नये त्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. रस्ता पक्का करून जागोजागी नागरिकांसाठी रस्त्याच्या कडेला बाकडे बसविण्यात आली आहेत. येथील अन्य प्रश्न मार्गी लावले जातील

- राहुल कलाटे, माजी नगरसेवक गटनेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.