Cycle Wari : जेष्ठांची पर्यावरणपूरक सायकल वारी, पंढरीतील विठुरायाच्या दारी

पर्यावरण संवर्धन व सदृढतेसाठी जेष्ठांचा सहाशे किमीचा सायकल प्रवास
Cycle Wari
Cycle Warisakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड - प्रखर ईच्छाशक्ती असेल तर अशक्य असे काहीच नाही असाच जणू संदेश वाकडमधील ६५ ते ७० वर्षांच्या पाच जेष्ठ तरुणांनी समाजाला दिला आहे. आजच्या तरुण पिढीला पर्यावरण संवर्धनाचे अन आरोग्याच्या सदृढतेचे महत्व पटवून देण्यासाठी या जेष्ठांनी सोमवारी (ता. १९) सायंकाळी वेणूनगर येथून पंढरपूरच्या दिशेने सायकल वारीचे प्रस्थान केले.

Cycle Wari
Water Level : बोअरवेल आटल्या; पाणीपातळी खालावली

गणेश ढोरे, संदीपान सामसे, हरिश्चंद्र गायके, रामकृष्ण कोरडे, वसंतराव बुधावले असे या सायकल वारी करणाऱ्या जेष्ठांची नावे आहेत. हे सर्वजण ६५ ते ७० वर्षांच्या वरील वयाचे आहेत. सहा दिवसांचा तब्बल सहाशे किमीचा प्रवास हे जेष्ट सायकलपटू करणार आहेत. गुरुवारी (ता. २२) ते दुपारनंतर पंढरपूरात पोचणार आहेत पांडुरंगाचे दर्शन घेऊन एक दिवस विश्रांती करून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

तत्पूर्वी सोमवारी वेणूनगर येथील विरंगुळा केंद्रात आयोजित निरोप समारंभाला परिसरातील जेष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अध्यक्ष मधुकर रहाटे, सचिव मनसुखलाल शहा, संचालक सुरेश जमदाडे, दिलीप ढाणे, तुकाराम मश्राम यांच्यासह सर्व सभासदांनी या वारकऱ्यांचा यथोचित सन्मान केला. पुढील सुकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Cycle Wari
Pavana Dam Water : पाणी कपातीचे संकट पिंपरी-चिंचवडच्या वेशीवर; ४० दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक

प्रतिक्रिया

विरंगुळा केंद्र वेनूनगर येथून आम्ही ज्येष्ठ नागरिक पंढरपूर वारीला निघत आहोत पर्यावरणाचे संवर्धन आणि सदृढतेचा संदेश तरुण पिढीला देण्यासाठी आम्ही सायकल प्रवास करून पंढरपूर वारीला निघालो आहोत सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची शिदोरी पाठीशी घेऊन आम्ही हा प्रवास करत आहोत.

- गणेश ढोरे, सायकल वारकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.