Wakad Flood Water : विनोदे नगर परिसरातील घरात, चाळीत पाणी; गरीब कुटीबीयांचे हाल

विनोदे नगर परिसरातील व शेतीतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या एक जुन्या ओढ्याला बुजविण्यात आले, तेंव्हापासून प्रत्येक पावसाळ्यात समस्या उद्भवत आहे.
Flood water in home and chawl
Flood water in home and chawlsakal
Updated on

वाकड - डेव्हलपमेंटच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकांनी केलेली निसर्गाची हानी, पावसाचे पाणी जाणारे बुजविण्यात आलेले नैसर्गिक ओढे, नाले या सर्वांचा गुरुवारी (ता. २५) विनोदे नगर मधील काही रहिवाशांना मोठा फटाका बसला काहींच्या घरात आणि एका चाळीत पाणी शिरल्याने हातावारल्या गरीब कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले.

विनोदे नगर परिसरातील व शेतीतील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या एक जुन्या ओढ्याला बुजविण्यात आले, तेंव्हापासून प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या उद्भवत आहे. यंदा मात्र, जास्तच पाणी आल्याने सर्वांची तारांबळ उडाली. बुधवारी (ता. २४) रात्री पाणी वाढण्यास सुरुवात झाली तर गुरुवारी सकाळपर्यंत विशाल विनोदे यांच्या बंगल्यात व दोन खोल्यात, सागर विनोदे यांच्या घरात व चाळीत सुमारे सहा फूट पाणी शिरल्याने सर्वांचे खुप हाल सुरु आहेत.

चाळीत राहणाऱ्या ३२ सर्वसामान्य हातावरल्या पोटांची मोठे नुकसान व हेळसांड झाली.घरातील सर्व अन्न-धान्य, किराणा वाहून गेला. गरीब कुटूबियांना चिल्या पिल्यासह घर सोडावे लागले. आपापल्या परीने प्रत्येकजण नातेवाईक व मित्रांकडे शिफ्ट झाले. धो-धो बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने ही परस्थिती उद्भवली. शुक्रवारी काहिसे पाणी ओसरले आहे. विनोदेनगर चौक ते आल्हाट वस्ती हा २४ मिटर डीपी रस्ता पुर्ण करून रस्ता करताना रेनवॅाटर लाईन टाकल्यास पाणी रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे हा रस्ता तातडीने करण्याची मागणी रहिवाशांनी केली.

प्रतिक्रिया

आता ओढा तर राहिला नाही, मात्र, विनोदे नगर चौक ते आल्हाट वस्ती हा रस्ता झाल्यास दिलासा मिळेल. ह्या रस्त्यातील ८० टक्के भूसंपादन झाले असुन एक दोन स्थानिक रहिवाशांच्या अडचणी सामोपचाराने सोडवल्यात तर रस्ता होण्यास अडचण येणार नाही. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करतय. आजच्या पावसामुळे शेतीचे बांध वाहून गेले असुन खुप नुकसान झाले आहे.

- विशाल विनोदे, बाधित, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.