पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा होणार सुरळीत

चऱ्होली, मोशी, बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, चिंचवड, पिंपरीगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी या भागात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही.
Ravet Water Supply
Ravet Water SupplySakal
Updated on

पिंपरी - रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील (Ravet Impure Water Abstraction Center) मोटारमध्ये पाणी (Water) जाऊन रविवारी रात्री साडेबाराला व्हॉल्व्ह फुटला. (Volve Leakage) यातूनच इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनेलमधील उच्चदाबाच्या स्वीच गिअरमध्ये (Switch Gear) पाणी गेल्याने मोठ्या दाबाने पाण्याचा फवारा उडाला. गेल्या ३५ वर्षांत धमाका होऊन व्हॉल्व्ह फुटण्याची ही पहिलीच घटना घडल्याने मोठी जिवीत हानी टळली. गेल्या तीस तासांपासून कर्मचारी सर्व इलेक्ट्रिक उपकरणे हिटर, ड्रायर, स्प्रे, एअर प्रेशर, हॅलोजन व हिटच्या साह्याने सुकविण्याचे काम करीत आहेत. टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन या भागातील सर्व यंत्रांची तपासणी मंगळवारी (ता. ८) सायंकाळी पूर्ण झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Water Supply to Pimpri Chinchwad will be Continue)

चऱ्होली, मोशी, बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, चिंचवड, पिंपरीगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी या भागात दोन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. भोसरी व चिंचवड भागातील पुरवठा पूर्णपणे बंद झाला. रावेत जलउपसा केंद्रातील पंप जळाल्यास किंवा विद्युत उपकरणांना आग लागली असता मोठी दुर्घटना टळली. सर्व विद्युत पंप आणि उपकरणे क्षणांत बंद पडली. पाणी पुरवठा विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी काम करणाऱ्या पंपचालकांनी प्रसंगावधान दाखवून त्वरित मोटार व इलेक्ट्रिक स्वीच बंद केले.

Ravet Water Supply
पिंपरी : 'म्यूकरमायकोसिस'वरील इंजेक्शनची काळ्या बाजाराने विक्री

सोमवारी रात्री साडेबारापासून पंपिंग स्टेशनमधील स्पेअर पार्ट सुकविण्यापासून ते सुटे भाग साफ करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व पॅनेल कापसाने सुकविले जात आहेत. तापमान योग्य राखण्यासाठी ठिकठिकाणी पंखे, उच्च दाबाचे हॅलोजन तापमान लावले आहेत. सर्व पॅनेलमध्ये बारीक बारीक वायर व गुंतागुंतीचे सुटे भाग असल्याने कापसाच्या साह्याने पाणी काढले जात आहे. काही काळ उपकरणे गरम भट्टीत ठेवले जाणार आहेत. अन्यथा पुन्हा स्फोट होण्याची भीती आहे.

सद्यःस्थिती

  • टप्पा १ ते ४ - २१ पंप

  • टप्पा १ व २ - १२ मोटार

  • टप्पा ३ व ४ - अखंड सुरू

  • एकूण पंपिंग क्षमता - १०० एमएलडी

  • एक पंप - तीस एमएलडी

  • एकूण - १५० एमएलडी

  • पहिल्या टप्पा - ५० एमएलडी

  • दुसऱ्या टप्पा - ८० एमएलडी

  • मुख्य पंप - सहा पंप

  • कौशल्याधारित पंपचालक - ४०

संपूर्ण पाइपलाइनची दुरुस्ती करून व्हॉल्व्ह बसविला जाणार आहे. पॅनेल जळण्याची सर्वांत मोठी भीती निर्माण झाली होती. जळालेल्या मोटार काढल्या आहेत. व्हॅनिशिंग सुरू आहे. सोमवारी रात्री साडेबारापासून अहोरात्र काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली आहे. पंपांचे रीडिंग घेण्याचे काम दररेाज सुरू असते. कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. उपकरणांचे नुकसान झाले नाही.

- संदेश चव्हाण, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.