Pune Rain Update : पाऊण तासाच्या पावसात भूमकर चौक चॉकअप, वाहनांच्या रांगा

धो-धो बरसलेल्या पावसामुळे भूमकर चौकातील भुयारी पुलात तब्बल गुडघाभर पाणी साठले
rain in wakad
rain in wakadsakal
Updated on

वाकड : सोसाट्याच्या वाऱ्यासह गुरुवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊण तास धो-धो बरसलेल्या पावसामुळे भूमकर चौकातील भुयारी पुलात तब्बल गुडघाभर पाणी साठले.

त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आयटीयन्ससह स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनःस्थापाला सामोरे जावे लागले. अनेक वाहने या पाण्यात बंद पडली.

भूमकर चौकात ही अवस्था व समस्या गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. एखाद्या अवकाळी पावसात अशी अवस्था होत असेल तर पावसाळ्यात काय परस्थिती होईल याचा विचार महापालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे.

मात्र, ऐन कामावरुन घरी जाण्याची वेळ, त्यात वाकड वाहतूक पोलीसांनी वाहतूक मार्गात केलेले प्रायोगिक बदल अन अचानक आलेला अवकाळी पाऊस यामुळे चाकरमान्यांची मोठी त्रेधातीरपीट झाली.

Pune Rain Update
Pune Rain Update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.