सासुरवाशीणी रमल्या माहेरच्या शेतात; पावसाळ्यात मिळालं माहेरसुख

सासुरवाशीणी रमल्या माहेरच्या शेतात; पावसाळ्यात मिळालं माहेरसुख
Updated on

नवी सांगवी (पुणे) : भारतीय स्त्रियांना असणारी माहेरची ओढ ही सर्वश्रुत आहे. श्रीमंत घरात दिलेली सासुरवाशीण आपल्या गरीब बापाकडे चार दिवस का होऊना वर्षातून किमान दोन वेळा विसाव्याला येत असते. मुलांच्या दिवाळी व उन्हाळी सुटी हे खासकरून शहरातील सासुरवाशिणींसाठी अर्जित रजेचेच काम करीत असतात. कारण मुलांना सुट्या असल्यामुळे त्यांना घेऊन माहेरी जाऊन आई-वडील, भाऊ-वहिणी, बहिण व भाचेकंपनींचा सहवास मिळत असतो. वर्षभर संसाराचा गाडा रेटल्यावर लेकीला बापाच्या घरी मनावरील ताण कमी करायला विरंगुळा मिळतो. 

यंदाच्या उन्हाळी सुटीत नेमका कोरोनानी शिरकाव केला. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने सगळे व्यवहार ठप्प झाले. खरंतर गृहिणींना माहेरी जायला ही आयतीच संधी मिळाली होती. परंतु, सरकारने सुरुवातीला दहा, नंतर तीन आठवडे व नंतर महिनाभर लॉकडाउनची मुदत वाढविली. गावी जायचे, तर ना रेल्वे ना एसटी उपलब्ध, अगदी स्वतःच्या वाहनाने जायचे, तर जिल्हा नाकेबंदी करून सर्व बाजुंनी पोलिसांनी रस्ते बंद केले होते. पोलिसांचे पास केवळ अत्यावश्यक व वैद्यकीय सेवेकरीताच उपलब्ध होते. बर जायचे म्हटले, तरी नवऱ्याला सोडून कसे जायचे. कारण खाणावळ, हॉटेल सर्वच बंद झाल्याने त्यांचे जेवणाचे कसे होईल, या चिंतेने सासुरवाशीण घरीच थांबली. घरातील सर्व सदस्य आराम करीत असताना 'ती' मात्र सगळ्यांच्या सेवेला तत्पर हजर होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याउलट लॉकडाउनमध्ये खवय्येगिरी अधिकच वाढली. घरातील सदस्यांकडून दररोज नवनवीन पदार्थांची फर्माईश तिला येऊ लागल्या. सोशल मीडियावर रोजच्या रोज बनणाऱ्या रेसिपींची जणू स्पर्धाच लागली होती. यामुळे तिची किती दमछाक होतेय, हे घरातील इतर सदस्यांच्या लक्षात येत नव्हते. पण तिचाही उत्साह कमी होत नव्हता. दोन महिन्यांनंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. जनजीवन पूर्ववत नाही. परंतु बऱ्यापैकी ठिकठाक होऊ लागले. पोलिसांचे पासेसही मिळू लागले. गावातील लोकांनीही आपले नियम शिथिल केले. परंतु, शाळा आणि महाविद्यालये अजून चालू होणार नाही, याचा अंदाज सर्वांनाच टिव्ही व वर्तमानपत्रातील बातम्यांवरून आला. 

हॉटेल, खाणावळीत पार्सल सेवा सुरू झाल्यावर सासुरवाशिणी नवऱ्याकडे माहेरी जाण्याची इच्छा धरू लागल्या. नवऱ्यांनीही त्याला मान्यता दिली. यंदाचा उन्हाळा नाही. परंतु, पावसाळा मात्र, या सासुरवाशीणींना भावला. पावसाच्या तोंडावर शेतीची कामे सुरू होतात. माहेरी सुद्धा मग ती शेतात आपल्या गणगोतासह रमू लागली. नवीन रोप लावणे, किटकनाशक फवारणे, अशी कामे माहेरवाशिण समाधानाने करू लागली. एकंदरच काय, तर कोरोनाच्या मेहेरबाणीमुळे सासुरवाशीम यंदा पावसाळ्यातच माहेरी रमल्या असंच म्हणाव लागेल. त्यातच आजपासून दहा दिवसाचा लॉकडाउन सुरू झाल्याने तिचा माहेरचा मुक्काम वाढला. त्यामुळे आणखी दहा दिवस सक्तिची विश्रांती तिच्या वाट्याला मिळाली. यामुळे तिला यंदाचही माहेरसुख लाभलं. 
 

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.