षडयंत्राला बळी न पडता काम करा- विलास लांडे

माजी आमदार विलास लांडे यांचे पदाधिकार्यांना अवाहन
pcmc
pcmcsakal
Updated on

पिंपरी : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकारी फितूर झाल्याचे चित्र विरोधक तयार करीत आहेत. पक्षांतर्गत वाद व अविश्वास त्यांच्याकडून निर्माण केला जात आहे. विरोधकांच्या या षडयंत्राला बळी न पडता काम करा,’’ असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना एका पत्रकाव्दारे केले आहे. (PCMC News)

पत्रकात लांडे म्हणतात, ‘महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बांधणीला सुरूवात झाली आहे. पक्षाची एकजूट दाखविणे गरजेचे आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. आघाडीतील शहरातील मित्र पक्षाला देखील विश्वासात घेऊन निवडणुकीत काम करू या. निवडणुका समोर असल्याने आजपर्यंतच्या चुका दूर करून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम आपण हाती घेणे गरजेचे आहे. महापालिकेवर एकहाती सत्ता आणायची आहे. त्यासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची आहे.

pcmc
पिंपरी-चिंचवड शहरात आज २१६ नवीन रुग्ण

निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी विरोधकांकडून पक्षात तेढ निर्माण केली जात आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांशी सलोखा साधून कार्यकर्त्यांमध्ये अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांकडून पुष्टी मिळत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचू नये, यासाठी आपण प्रयत्न करू. कार्यकर्त्यांनी समाजात घडवून आणलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.