पिंपरी : मोशीमध्ये उभारण्यात येत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या प्रकल्पामधील खुल्या प्रदर्शन केंद्राचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. खुल्या प्रदर्शन केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे कामही पावसाळ्याअगोदर पूर्ण करण्यात आले असून, त्याठिकाणी देशी झाडांची लागवड करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शने भरवता येणार आहेत.
देश विदेशात कार्यरत असणाऱ्या उद्योगांकडून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विपणनासाठी एक व्यासपीठ मिळावे, म्हणून मोशी परिसरात 240 एकर जागेमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाकडून हे काम सध्या सुरु आहे. पहिल्या टप्यामध्ये खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
या आहेत सुविधा...
खुल्या प्रदर्शन केंद्रात अंतर्गत रस्ते, स्वच्छता गृह आदी प्रकारच्या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. 20 हेक्टर जागेमध्ये हे केंद्र राहाणार असल्यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रदर्शने भरवता येणार आहेत. या प्रदर्शन केंद्राचा परिसर आकर्षक करण्यासाठी या भागामध्ये वृक्षारोपण करण्यात आले असून ही झाडे मोठी झाल्यानंतर हा परिसर प्रशस्त आणि हिरवागार दिसणार आहे. दरम्यान, प्राधिकरणाकडून खुल्या प्रदर्शनांसाठी ही जागा सध्या उपलब्ध करुन देण्यात येत आहे. खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी प्रदर्शन भरण्याची संख्या वाढू शकते.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑटोमोबाइल कंपन्यांसाठी फायदेशीर...
चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात विदेशी कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प सुरु केले असून, त्यामध्ये ऑटोमोबाइल कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी, दिल्लीतील नोएडामध्ये ऑटो एक्झिबिशन भरत असते. खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी अशा प्रकारचे प्रदर्शन भरवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहन उद्योगातील कंपन्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. पुढील वर्षांपासून इथे भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनाच्या संख्येत वाढ होऊ शकते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मोशीमध्ये उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील खुल्या प्रदर्शन केंद्राचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
- प्रभाकर वसईकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.