World Breastfeeding Day Special : वायसीएमला गरज ‘ह्युमन मिल्क बॅंके’ची

World Breastfeeding Day Special : नवजात बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी आईचे दूध ही अत्यंत आवश्‍यक बाब आहे.
World Breastfeeding Day Special
World Breastfeeding Day Special sakal
Updated on

पिंपरी - नवजात बालकाच्या उत्तम आरोग्यासाठी आईचे दूध ही अत्यंत आवश्‍यक बाब आहे. मात्र, अनेकदा वैद्यकीय कारणास्तव बालकाला आईचे दूध मिळू शकत नाही. अशा वेळी इतर मातांनी दान केलेले दूध बालकाला दिले जाते. असे दूध साठविण्यासाठी मिल्क बॅंकेची आवश्‍यकता असते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासह महापालिकेच्या एकाही रुग्णालयात मिल्क बॅंक नसल्याने येथील गरजू नवजात बालकांसाठी खासगी रुग्णालयातून दूध विकत घेण्याची नामुष्की पालकांवर ओढवत आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या गरीब व दुर्बल घटकांतील महिला प्रसुतीसाठी येत असतात. गर्भवती असताना आहार व्यवस्थित न घेतल्याने प्रसुतीनंतर या महिलांना पुरेसे दूध येत नाही. पहिले तीन दिवस दूध कमी येणे, सिझेरियनमुळे स्तनपान करण्यात अडचणी येणे, प्रसुतीदरम्यान मातेचा मृत्यू होणे, मातेला आजार झाल्याने औषधोपचार सुरू असणे अशा विविध परिस्थितीत आई बालकांना दूध पाजू शकत नाही.

मिल्क बॅंकेतून मातेचेच दूध बाळाला देण्यात येत असल्याने आईच्या दूधाचे सगळे फायदे बाळाला मिळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असल्याने ह्युमन मिल्क बॅंक ही काळाची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगतात. परंतु; वायसीएमसारख्या रुग्णालयातील गोरगरीब मातांनी गरज असल्यास हे दूध कुठून खरेदी करायचे ? हा खरा प्रश्‍न आहे.

काय आहे मिल्क बॅंक ?

  • एखाद्या नवजात बालकाला आपल्या आईचे दूध मिळू न शकल्यास त्याला दुसऱ्या मातेचे दूध मिल्क बॅंकेतून मिळवून देता येऊ शकते

  • ज्या मातांना आपल्या बाळाची भूक भागवून अधिक प्रमाणात दूध येते; अशा माता आपल्या स्वेच्छेने या बॅंकेला दूध दान करू शकतात

  • या बॅंकेकडे दान केले जाणारे दूध हे शारीरिकदृष्ट्या निरोगी व सुदृढ मातांकडूनच केले जाते

  • बॅंकेला मिळालेले दूध एका ठराविक तापमानामध्ये साठविले जाते.

  • त्या दुधाचे निर्जंतुकीकरण केले जाते.

World Breastfeeding Day Special
Video : लोखंडी गेट अंगावर पडून पिंपरी चिंचवडमध्ये चिमुरडीचा मृत्यू; घटनेच्या व्हिडीओने खळबळ

आम्ही मिल्क बॅंकेसाठी जागा शोधली आहे. या मिल्क बॅंकेसाठी आवश्‍यक बाबींची पडताळणी केलेली आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून महापालिकेकडून मान्यता आल्यावर कामाला सुरुवात केली जाईल.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था

वायसीएममध्ये प्रसूती होणाऱ्या बहुतांश महिला गरीब कुटुंबातील असतात. त्यांनी गरोदरपणात फारशी काळजी घेतलेली नसते. प्रसूतीनंतर बाळही कमी वजनाचे असते; मातांनाही प्रसूतीनंतर पुरेसे दूध येत नाही. या बालकांसाठी खासगी मिल्क बॅंकेतून दूध विकत घेणे महिलांना परवडत नाही. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात स्वतःची ह्युमन मिल्क बॅंक असावी, असा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे.

- डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभाग प्रमुख, वायसीएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.