जागतिक उच्च रक्तदाब दिन : स्त्रियांच्या तुलनेत पुरुष रुग्ण अधिक

हायपरटेन्शन म्हणजे उच्चरक्तदाब हा आजार नाही. मात्र, विविध आजारांना निमंत्रण देत चोरपावलांनी येणारा विकार आहे.
hypertension
hypertensionsakal
Updated on
Summary

हायपरटेन्शन म्हणजे उच्चरक्तदाब हा आजार नाही. मात्र, विविध आजारांना निमंत्रण देत चोरपावलांनी येणारा विकार आहे.

पिंपरी - हायपरटेन्शन (Hypertension) म्हणजे उच्चरक्तदाब (High Blood Pressure) हा आजार (Sickness) नाही. मात्र, विविध आजारांना निमंत्रण देत चोरपावलांनी येणारा विकार आहे. हे टाळण्यासाठी केवळ आहार आणि जीवनशैलीकडेच लक्ष देणे पुरेसे नाही, तर तणाव कमी करण्यासाठी आणि शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी व्यायामही आवश्यक आहे.

सध्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. यात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

ही आहेत कारणे...

  • कमी वेळ झोप

  • सतत फास्ट फूड खाणे

  • अति गॅजेट्सचा वापर

  • मानसिक व परीक्षांचा ताणतणाव

  • कमी वयात, मोठ्या अपेक्षा

  • लठ्ठपणा

  • कामकाजाचे बदलते स्वरूप

  • आनुवंशिकता

  • अचानक बसलेला मानसिक धक्का, अवेळी गर्भधारणा, भीती

  • अमली पदार्थांचे व्यसन

मेडिसिन विभागातील दैनंदिन ओपीडीचे प्रमाण वर्ष (२०२२)

  • १८० ते २०० - जानेवारी

  • २३० ते २५० - फेब्रुवारी

  • ३०० ते ४०० - मार्च

  • ४५० ते ५०० - एप्रिल

हे आहेत उपाय

  • भरपूर आहार घेण्याचे ध्येय ठेवा

  • फळे व भाजीपाल्यावर भर द्या

  • अख्खे व कोंब आलेले कडधान्य खा

  • चरबीयुक्त डेअरी उत्पादने कमी करा

  • त्वचाविरहित पोल्ट्री आणि लाल मांस टाळा

  • नॉन-ट्रॉपिकल वनस्पती तेल कमी करा

  • संतृप्त आणि ट्रान्स फॅट्स कमी करा

  • मिठाई आणि साखर-गोड पेय कमी करा

  • मिठाचे सेवन ४ ते ६ ग्रॅमपेक्षा जास्त नसावे

एप्रिल महिन्यात १३ मे रोजी १६८७ रुग्णांची नोंद झाली असून त्यात मेडिसिन विभागात ४८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात नियमित रुग्ण तपासणीसाठी येत असतात. ज्यात मधुमेह व रक्तदाब देखील आहेत. परंतु, नवीन रुग्ण ३७ पुरुषांपैकी २० रुग्ण रक्तदाबाचे आहेत. नवीन ४५ महिला रुग्णांमध्ये २५ रुग्ण रक्तदाबाचे आहेत. मागील ५ वर्षात सरासरीने यात वेगाने वाढ होत आहे.

- डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय अधिकारी व फिजिशियन, वायसीएम

वायसीएम रुग्णालयामधील रुग्णांची आकडेवारी

  • १६०० ते १७००- बाह्य रुग्ण विभागात दररोज येणारे

  • ३५० ते ४०० - दैनंदिन मेडिसिन विभाग ओपीडी

  • सुमारे २७० - नियमित रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात किडनी संबंधित आजार असणारे जुने

  • २० ते २५ पुरुष, २० ते २५ महिला - नियमित रक्तदाब असणारे नवीन

  • ३८ पुरुष, ४५ महिला - वयोगट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()