Accident : आई-वडिलांची सेवा करणाऱ्या आदर्श पुत्राचे अपघाती निधन

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे, भरधाव डंपर चालवीणाऱ्या चालकाने दुचाकीवर घराकडे निघालेल्या या तरुणाला चिरडले.
Akshay Bhoine
Akshay BhoineSakal
Updated on

- बेलाजी पात्रे

हिंजवडी - दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा! पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!!! आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगुळकर यांच्या गीत रामायणातील या ओळी आठवायाचे कारण म्हणजे, नवस सायास करून तब्ब्ल तेरा वर्षांनी जन्मलेल्या एकुलत्या एक लाडक्या मुलावर अंतिम संस्कार करण्याची वेळ हिंजवडीतील दुर्दैवी माता-पित्यांवर आली.

ही हृदयस्पर्शी व मन हेलावणारी घटना आयटी नगरी हिंजवडीत घडली. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे, भरधाव डंपर चालवीणाऱ्या चालकाने दुचाकीवर घराकडे निघालेल्या अक्षय अशोक भोईने (वय २४, रा. बेंद्रे वस्ती हिंजवडी) या तरुणाला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (ता. १३) सकाळी सुसगाव येथे झाला.

याप्रकरणी त्याचे चुलत बंधू रमेश दामोदर भोईने (वय ४९ रा. गणेश नगर थेरगाव) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिल्यानुसार, श्रीमंत सदाशिव भांगे (वय ४३, रा. धायरी, पुणे) या डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अक्षय लवळे येथून (एमएच १२ एलके २०६०) या दुचाकीवरून रुग्णालयातून पुन्हा घरी परतत असताना सुसगाव ग्रामपंचायतसमोर मागून भरधाव वेगाने आलेल्या (एमएच १२ युएम ००१६) डंपरचालकाने त्याला चिरडले. अक्षयचे वडील अशोक भोईने हे हृदय विकाराच्या उपचारांसाठी लवळे येथील रुग्णालयात महिन्यापासून ऍडमिट आहेत. त्यांची देखभाल व सेवा सुश्रुशा अक्षय रुग्णालयात करत असे. शनिवारी घरी येत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.

अक्षय हा एकुलता एक लाडका मुलगा होता. तो नुकताच पदवीधर झाला होता. वडील हृदय विकाराचे रुग्ण तर आई देखील एका आजाराने त्रस्त असल्याने माता-पित्यांची सेवा करणारा तो आदर्श पुत्र व घराचा एकमेव भक्कम आधार होता. घटना समजताच आई-वडिलांनी हंबरडा फोडल्याने अवघी आयटी नगरी जणू सुन्न झाली होती. अक्षय स्वभावाने अतिशय शांत, संयमी व मनमिळावू असल्याने हिंजवडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.