'आम्ही त्यांना दवाखान्यात नेत होतो, लगेचं जमावाने दगडफेक केली', लाठीचार्जवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया

Jalna Maratha Reservation:ही घटना कशामुळे घडली? याची वेगवेगळी उत्तरं मिळत आहेत. अशातचं, औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती जाहीर केली आहे.
'आम्ही त्यांना दवाखान्यात नेत होतो, लगेचं जमावाने दगडफेक केली', लाठीचार्जवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया
Updated on

जालन्यातील अंतरवली सराटा येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यातील राजकारण तापलय. काही दिवसांपूर्वी जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या कारवाईमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले होते.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती, यामध्ये पोलिस दलातील अनेक जवान देखील जखमी झाले होते. ही घटना कशामुळे घडली? याची वेगवेगळी उत्तरं मिळत आहेत. अशातचं, औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती जाहीर केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे यांची प्रकृती ढासाळल्यावर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी येण्याची विनंती केली होती. मात्र, तिथे असलेल्या आंदोलकांनी लगेच दगडफेक सुरु केली, असे पोलीस महानिरीक्षक म्हणाले.

एएनआयशी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले की, "उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती ढासाळली होती, जेव्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दवाखान्याच नेण्यासाठी विनंती केली, तेव्हा ते उपचार घेण्यासाठी तयार झाले.

जेव्हा पोलीस त्यांना उपचारासाठी घेऊन जात होते, तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या जमावाने दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकी दरम्यान आमच्या पोलीस दलातील जवान जखमी झाले. त्यात २१ महिला आणि ४३ जवान, असे एकूण ६३ पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

जमावावर केलेल्या लाठीचार्जबद्दल सांगताना पोलीस अधिकारी म्हणाले की ,"आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. ४० लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलं आहे. आंदोलकांकडून काही बसेस जाळण्यात आल्या आहेत आणि आम्ही त्याचा तपास करत आहोत. अधिकचं पोलीस बळ तैनात करण्यात आलं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सावध पवित्रेत आहोत. असे औगंराबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले. "(Latest Marathi News)

'आम्ही त्यांना दवाखान्यात नेत होतो, लगेचं जमावाने दगडफेक केली', लाठीचार्जवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया
Girish Mahajan News: सत्ता असताना आरक्षण दिले नाही, आता विरोधकांना कळवळा का? गिरीश महाजन

जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या या घटनेमुळे महाराष्ट्रभरात निदर्शने करण्यात आली आहेत. आंदोलक मोठ्या प्रमाणात संतप्त झाल्याने महाराष्ट्र परिवहन मंडळाने बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बसेस बंद झाल्याने खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. (Latest Marathi News)

'आम्ही त्यांना दवाखान्यात नेत होतो, लगेचं जमावाने दगडफेक केली', लाठीचार्जवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची पहिली प्रतिक्रिया
Maratha Reservation Protest: लाज असेल तर राजीनामा द्यावा, आदित्य ठाकरेंची आक्रमक मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.