Nikhil Kamath १५ ऑगस्ट १९४७ साली कोणाला वाटलेलं ब्रिटनचा भावी PM भारतीय असेल?

"७५ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणीही विचार केला नसेल की, एक दिवस इंग्लंडच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाची व्यक्ती असेल."
Rushi Sunak
Rushi Sunakgoogle
Updated on

मुंबई : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rushi Sunak) इंग्लंडच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सर्वांत पुढे आहेत. कन्झर्व्हेटीव्ह पार्टीचे नेते ऋषी सुनक पंतप्रधान पदाच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकत आहेत. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांनंतरही ते सर्वांत पुढे आहेत.

दरम्यान ऑनलाइन ब्रोकींग फर्म जेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी ऋषी सुनक यांचे छायाचित्र पोस्ट करत एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "७५ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणीही विचार केला नसेल की, एक दिवस इंग्लंडच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाची व्यक्ती असेल."

Rushi Sunak
गरोदरपणात छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका; हे उपाय करा

या निवडणुकीत ५ जण असून त्यात ऋषी हे सर्वांत पुढे आहेत. पण त्यांच्याशी हा लढा अजून संपलेला नाही. कारण अजून ३ फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. प्रत्येक फेरीत सर्वांत कमी मते मिळवणारा उमेदवार बाहेर होईल.

कन्झर्वेटीव्ह पक्षाकडे ३५८ खासदार आहेत. पेनी मोर्डोंट यांच्याकडून ऋषी यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे. या पक्षाचे देशभरात २ लाख कार्यकर्ते आहेत.

Rushi Sunak
एकुलते मूल असण्याचे फायदे

ऋषी यांचा जन्म १२ मे १९८० रोजी इंग्लंडच्या साऊथम्पैटन येथे झाला. त्यांचे डॉक्टर आईवडील भारतीय वंशाचे होते. ऋषी हे तीन भावंडांमध्ये सर्वांत मोठे आहेत. त्यांनी विंस्चेस्टर महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.

२०१५ साली पहिल्यांदा ऋषी यांनी खासदार बनत राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ब्रेग्झिटचेही समर्थन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.