- अक्षर शेलार
विम वेन्डर्सच्या ‘परफेक्ट डेज’चं शक्य तितक्या कमी शब्दांमध्ये वर्णन करायचं झालं, तर असं म्हणता येईल की, ‘हा ठहरावाचा सिनेमा आहे’. इथे मुद्दाम हिंदी शब्द वापरला आहे, कारण सबंध सिनेमाभर हाच शब्द मनात रेंगाळत राहतो. हिरायामा (कोजी याकुशो) हा टोकियोमधील सफाई कामगार ‘परफेक्ट डेज’च्या केंद्रस्थानी आहे.