Madhurani Gokhale: "पुण्यातील भाजी मंडई, माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण"; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीच्या खास फोटोशूटनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकर यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकर यांच्या खास फोटोशूटनं वेधलं लक्ष
Madhurani Gokhale sakal
Updated on

Madhurani Prabhulkar : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर (Madhurani Gokhale) या अरुंधती ही भूमिका साकारतात. मधुराणी या मालिकेमुळे तसेच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. मधुराणी यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

मधुराणी यांचे खास फोटोशूट

मधुराणी यांनी त्यांच्या खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मधुराणी या जांभळ्या रंगाची साडी आणि ऑक्साइडचे इअरिंग्स अशा खास लूकमध्ये दिसत आहेत. हे फोटोशूट मधुराणी यांनी पुण्यातील भाजी मंडईत केलं आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मधुराणी यांनी या भाजी मंडईतील त्यांच्या खास आठवणी सांगितल्या आहेत.

मधुराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली...ह्या उत्साही आणि creative gang चे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे... पुण्यातील भाजी मंडई... माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण, तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग.! सकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील."

मधुराणी या सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करतात. त्यांना इन्स्टग्रामवर 357k फॉलोवर्स आहेत. मधुराणी यांना आई कुठे काय करते या मालिकेमुळे विशेष लोकप्रियाता मिळाली. या मालिकेत नवीन ट्वीस्ट येत असतात. या मालिकेत मधुराणी यांच्यासोबतच मिलिंद गवळी, रुपाली भोसले, अभिषेक देशमुख हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.