Aishwarya & Abhishek Divorce Rumors : अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा पुन्हा चर्चेत ? हा व्हिडीओ ठरला कारण

Aishwarya Abhishek Divorce Rumors : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचा डिव्होर्स होणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. काय आहे यामागे कारण जाणून घेऊया.
Aishwarya & Abhishek
Aishwarya & AbhishekEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. त्यातच पॅरिस फॅशन वीक आणि आयफा अवॉर्ड्सला ऐश्वर्याच्या हातात लग्नाची अंगठी असलेली पाहून या अफवा काही काळ शांत झाल्या होत्या पण पुन्हा एकदा या अफवांनी जोर धरला आहे याला कारण ठरलाय कौन बनेगा करोडपती च्या सेटवरील व्हिडीओ. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत असून यात अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस सेलिब्रेट केलेला पाहायला मिळाला पण या व्हिडीओमुळेच पुन्हा एका ऐश्वर्या-अभिषेक यांना अडचणीत आणलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.