Aashadhi Ekadashi : 'विठ्ठल विठ्ठल" म्हणत बिग बींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.
Amitabh Bachhan Post
Amitabh Bachhan PostEsakal
Updated on

Aashadhi Ekadashi : आज आषाढी एकादशी. सगळे वारकरी विठ्ठलाच्या नामात दंग होत आज अखेर पंढरपूरला पोहोचले आणि आता ते सगळे त्यांच्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत आहेत. आषाढी एकादशीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात आहे कलाकारांनी देखील सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या

अमिताभ यांची पोस्ट

बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेते शहनशाह अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांना आषाढी एकादशीच्या सोशल मीडिया पोस्ट च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 'आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 'अशी पोस्ट अमिताभ यांनी शेअर केली. सोबतच त्यांनी विठ्ठलाचा एक रील सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याच्या मागे विठ्ठलाचा जयघोष असलेलं गाणं लावलंय सोशल मीडियावर बिग बिनी शेअर केलेला हा व्हिडिओ आणि पोस्ट चर्चेत आहे

पंढरपुरात लोटला भक्तीचा महासागर

आज सगळीकडे आषाढी एकादशीचा उत्साह असून अनेक नेतेमंडळी, कलाकार मंडळी पंढरपूरमध्ये आलेल्या वारीमध्ये सहभागी झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठूरायाची पूजा पार पंढरपूर मंदिरात पार पडली.

Amitabh Bachhan Post
Kiran Mane : "त्यांच्या आठवणीत वारीत नाचून बेभान होतो"; किरण माने यांनी सांगितली वारीची भावूक आठवण

अमिताभ बच्चन कायमच महाराष्ट्रातील प्रत्येक सणाविषयी खास पोस्ट करत नागरिकांना शुभेच्छा देतात. त्यांच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होतं. बिग बींना महाराष्ट्रीयन संस्कृतीविषयी असलेला आदर आणि बऱ्याचदा ते करत असलेलं मराठी भाषणही गाजलं आहे. मध्यंतरी त्यांनी लता मंगेशकर यांच्यावर एक मराठी कविता शेअर केली होती.

अनेक मराठी कलाकारांनीही या आधी आषाढ महिन्यात होणाऱ्या वारीबाबत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमधून संत संप्रदायातील अनेक संतांची ओळख करून दिली. तर त्यांच्या वारी आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील पोस्टही चर्चेत राहिल्या होत्या.

Amitabh Bachhan Post
Aashadhi Wari 2024 : 'साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पालखी या संताला भेटायला येते' ; किरण मानेंनी उलगडली पंढरपूरला कधीही न गेलेल्या संताची गोष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.