Bharat Jadhav: स्वातंत्र्यदिनी भरत यांचा ट्रिपल धमाका ; एकाच दिवशी सादर करणार तीन गाजलेल्या नाटकाचे प्रयोग

Bharat Jadhav Play Update: मराठी अभिनेते भरत जाधव यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांच्या तीन गाजलेल्या नाटकांचे प्रयोग ते सादर करणार आहेत.
Bharat Jadhav
Bharat Jadhav Esakal
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते भरत जाधव यांनी आजवर फक्त नाटकच नाही तर सिनेमा आणि मालिकांमधूनही स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळख कमावलेल्या भरत यांनी अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. मराठी रंगभूमीवर 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत', 'ऑल दि बेस्ट', 'आमच्या सारखे आम्हीच' अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत.

काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे

१ ५ ऑगस्टला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात भरत यांच्या गाजलेल्या तीन नाटकांचे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. सकाळी 'अस्तित्व', दुपारी 'मोरूची मावशी' तर सायंकाळी 'पुन्हा सही रे सही' या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Bharat Jadhav
Prashant Damle: नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पालकांना काय केले आवाहन? वाचा महत्वाची बातमी

भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अस्तित्व' या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली असून नुकताच या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

याबद्दल भरत जाधव म्हणतात, '' प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी तीन वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाट्यप्रेमींसाठी घेऊन आलो आहे. या नाटकांवर आणि माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ही ऊर्जा मला मिळू शकते. ही तीनही नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील.''

Bharat Jadhav
Bharat Jadhav Birthday:'गोड गोजिरी' गाण्यामुळे तुटणार होती भरत - केदारची मैत्री! 'सही रे सही' नाटका दरम्यानचा भन्नाट किस्सा वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.