रेणुकास्वामी खून प्रकरणाला नवं वळण! 'या' अभिनेत्यानं नाव उघड न करण्यासाठी दिले 30 लाख; पोलिसांसमोर कबुली

पट्टगेरे येथील शेडमधील खुनात आपला हात असल्याचे दर्शनने मान्य केले नाही.
Renuka Swamy Murder Case Actor Darshan
Renuka Swamy Murder Case Actor Darshanesakal
Updated on
Summary

रेणुकास्वामी खून प्रकरणात विशेष सरकारी वकील (एसपीपी) बदलण्यासाठी सरकारवर कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

बंगळूर : रेणुकास्वामीच्या निर्घृण खून प्रकरणातील (Renuka Swamy Murder Case) आपले नाव कुठेही उघड न करण्यासाठी ३० लाख रुपये दिले होते, अशी कबुली संशयित आरोपी अभिनेता दर्शन (Actor Darshan) याने पोलिसांसमोर दिली. पोलिस चौकशीत दर्शन उर्फ ​​डी बॉसने स्वेच्छेने हा जबाब दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ३० लाख दिले होते, तसेच आपले नाव या प्रकरणात कुठेही येऊ नये, असे सांगितले होते, असे पोलिस (Karnataka Police) सूत्रांनी सांगितले.

Renuka Swamy Murder Case Actor Darshan
'रवींद्र वायकरांचं जिंकणं शंकास्पद, त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नका'; 'या' पक्षानं थेट लोकसभा सरचिटणीसांना धाडली नोटीस

मात्र, पट्टगेरे येथील शेडमधील खुनात आपला हात असल्याचे दर्शनने मान्य केले नाही. शेडच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दर्शन आठ जूनच्या रात्री जीपमधून शेडकडे येताना दिसला आहे. खुनानंतर दर्शनने आरोपींसोबत पार्टी केल्याचेही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून समजते.

मोबाईलचा शोध

रेणुकास्वामी आणि आरोपी राघवेंद्र यांच्या मोबाईलचा शोध सुरू आहे. हा मोबाईल या खटल्यात महत्त्वाचे साक्षीदार आहे. शोधासाठी अग्निशमन दलाशी संपर्क साधला आहे. सलग ११ दिवस मृत रेणुकास्वामी याच्या मोबाईलचा शोध सुरू आहे. आठ जून रोजी दुसरा आरोपी प्रदुष याने रेणुकास्वामी आणि राघवेंद्र यांचा मोबाईल काढून सुमनहळ्ळी येथील कालव्यात फेकून दिला होता.

Renuka Swamy Murder Case Actor Darshan
Sharad Pawar : मराठा, धनगर आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'आम्ही यात राजकारण आणू इच्छित नाही पण..'

व्हिडिओ रेकॉर्डिंग

आरोपींनी पट्टागेरे शेडमध्ये रेणुकास्वामी याच्यावर झालेल्या हल्ल्याचे चित्रीकरण या मोबाईल फोनवर केले होते. त्यामुळे रेणुकास्वामी आणि आरोपी राघवेंद्र यांचे मोबाईल हे या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सुमनहळ्ळी कालव्याजवळ पहाणी केली. बीबीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कालव्यात मोबाईलचा शोध घेतला. पोलिसांनी राजाजीनगर अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांना मोबाइल शोधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, प्रदुषने मोबाईल फोनची विल्हेवाट लावण्याची किंवा नासधूस करून सुमनहळ्ळी कालव्यात टाकल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दर्शनने मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या चार जणांना प्रत्येकी पाच लाख दिले आणि रेणुकास्वामीच्या निर्घृण खुनात त्यांची नावे येऊ नयेत, यासाठी आरोपी प्रदुषला ३० लाख दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निखिल आणि केशवमूर्तीला प्रत्येकी ३० लाख दिले होते. खोटी कबुली देऊन तुरुंगात गेल्याबद्दल राघवेंद्र आणि कार्तिक यांच्या कुटुंबीयांना दर्शनने प्रत्येकी पाच लाख दिले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Renuka Swamy Murder Case Actor Darshan
'मराठा समाजाला कायमचं आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे'; आरक्षणावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

सरकारी वकील बदलण्यासाठी दबाव नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळूर : रेणुकास्वामी खून प्रकरणात विशेष सरकारी वकील (एसपीपी) बदलण्यासाठी सरकारवर कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘सरकारने नियुक्त केलेले एसपीपी प्रसन्नकुमार यांच्या बदलीसाठी कोणताही दबाव नाही. कोणत्याही मंत्री किंवा आमदाराने आमच्यावर दबाव आणला नाही आणि आम्ही कोणाच्याही दबावाला झुकणार नाही. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’

गृहराज्यमंत्री परमेश्वर म्हणाले, ‘रेणुकास्वामी खून खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलण्याबाबत आपल्याला माहिती नाही. जर बदल करायचा असेल तर महाधिवक्ता आणि कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन सरकार पुढे जाईल. विशेष सरकारी वकील बदलण्यासाठी काही लोकांनी दबाव आणला हे खरे नाही. गरज भासल्यास एसपीपी बदलण्यात काहीच गैर नाही. कारण असेल तेव्हा असे निर्णय घेतले जातात. हे प्रकरण कमकुवत करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट करून या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी करत आहेत. दर्शनचा व्यवस्थापक बेपत्ता झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. दर्शनाचा यात सहभाग असेल तर सरकारही तपासाला परवानगी देईल. त्यावर काय कारवाई करायची तो निर्णय आम्ही घेऊ, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.