Video: 'आपण पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये राहतो का?'; बेंगळुरुमध्ये अभिनेत्री आणि पतीवर हल्ला

कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री हर्षिका पूनाचा (Harshika Poonacha) हिने आपल्यावर आणि पतीवर स्थानिक भाषा बोलल्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
Harshika Poonacha
Harshika Poonacha
Updated on

बेंगळुरु- कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेत्री हर्षिका पूनाचा (Harshika Poonacha) हिने आपल्यावर आणि पतीवर स्थानिक भाषा बोलल्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हर्षिका हिने असाही दावा केलाय की, त्यांना लुटण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. अभिनेत्रीने इंन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आलेल्या अनुभव सांगितला आहे.

हर्षिकाने आरोपींचे फोटो देखील शेअर केले आहेत. आपण स्थानिक लोक बेंगळुरुमध्ये किती सुरक्षित आहोत? आपण पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये राहत आहोत का? असा सवाल देखील तिने आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे. (Actor Harshika Poonacha and Husband Attacked By Mob In Bengaluru Instagram post)

Harshika Poonacha
Actor Prakash Raj : प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा दाखल; असं नेमकं काय घडलं?

अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी ती आपल्या कुटुंबासोबत बेंगळुरुमधील कर्मा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेली होती. ज्यावेळी ते जेवण करुन बाहेर पडले आणि गाडीमध्ये बसले. त्यावेळी काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.

अभिनेत्री म्हणाली की, काही दिवसांपूर्वी मला खूप वाईट अनुभव आला आहे. फ्रासेर टाऊन भागातील पुलिकेशी नगरमधील माजीद रोडवर कर्मा नावाचे एक रेस्टॉरंट आहे. आम्ही जेवल्यानंतर बाहेर पडतो. पार्किंमधून गाडी बाहेर काढत होतो. त्यावेळी दोन व्यक्ती कारजवळ आले, त्यांनी असा आरोप केला की तुमच्या गाडीचा आम्हाला धक्का लागणार होता.

माझ्या पतीने त्यांना हटकले. कारण,ते न घडलेल्या प्रकाराबाबत बोलत होते. यानंतर त्यांनी आमच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. एकाने माझ्या पतीच्या तोंडावर मुक्का मारला आणि म्हणाला की, या स्थानिक कन्नडी लोकांना धडा शिकवायला हवा. माझ्या पतीने खूप संयम ठेवला. त्याने काही प्रतिकार केला नाही, असं अभिनेत्री म्हणाली.

पुढील तीस मिनिटात जवळपास ३० लोक तेथे आले. त्यांनी माझ्या पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढण्याचा प्रयत्न केला. यात चेन तुटली, पतीने कसंतरी करुन ती चेन माझ्याकडे दिली. यादरम्यान लोक गाडीची तोडफोड करत होते आणि पतीला मारहाण करत होते. ते त्यांच्या कोणत्यातरी भाषेत बोलत होते. आम्हाला त्यांची भाषा समजत नव्हती. कुटुंब सोबत असल्याने पतीने जास्त विरोध केला नाही, असं हर्षिका म्हणाली आहे.

Harshika Poonacha
TIME 100 2024: सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर;अभिनेत्री आलिया भट्ट अन् कुस्तीपटू साक्षी मलिकच्या नावाचा समावेश

मला असं लक्षात आलं की, आम्ही कन्नडमध्ये बोलत होतो, याचा त्यांना राग आला होता. मी आणि माझा पती कन्नडमध्ये बोलत असल्याने ते चिडले होते. हे स्थानिक कन्नडी लोक आहेत असं आरोपी म्हणत होते. मी पोलिसांना फोन केला तेव्हा काही सेकंदात ते तेथून पसार झाले. पण, पोलीस त्याठिकाणी आले नाहीत. कुटुंबाची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही पोलिसात तक्रार न करण्याचा निर्णय घेतला, असं हर्षिका म्हणाली. (Entertainment News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.