Jay Dudhane Post : बिग बॉस मराठी सीजन ३ चा उपविजेता आणि स्पर्धक जय दुधाने (Jay Dudhane) त्याच्या बिग बॉसमधील परफॉर्मन्समुळे लोकप्रिय झाला आणि नुकतीच त्याने मालिकाविश्वात एंट्री घेतली. त्याची टेलिव्हिजनवर सध्या 'येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
एकीकडे प्रोफेशनल कारकीर्द उत्तम सुरु असताना वैयक्तिक आयुष्यात जयला मोठा धक्का बसला. जयचे वडील अनिल दुधाने यांचं कार्डिआक अरेस्टमुळे निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जयने ही बातमी सगळ्यांना सांगितली.
जयने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही बातमी शेअर केली. "मला कधीच वाटलं नव्हतं मी हे असं काही शेअर करेन. २४ जूनला मध्यरात्री मी माझ्या सुपरहीरोला कार्डियाक अरेस्टमुळे गमावलं. ते केवळ आमच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर ओळखीच्या प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांना नेहमी त्यांचा प्रामाणिकपणा आणि कायम मदतीसाठी तयार असणारा स्वभाव यामुळे ओळखलं जायचं. समाजकार्य करणं ही त्यांची आवड होती. कधीही ते पैशांच्या मागे गेले नाहीत, त्यांनी कायम एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला. माझे सर्व मित्र त्यांना अनिक काका बोलायचे तर, त्यांचे सगळे मित्र त्यांना अनिल भाई म्हणायचे. माझ्या वडिलांना ओळखणारे सगळे त्यांना आता शेवटचं पाहू शकतात. ते नेहमीच आपल्या सगळ्यांच्या हृदयात आणि मनात कायम राहतील. पण, यापुढे २४ जून हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असेल. कारण, मी फक्त माझे वडील नाहीतर माझा एक सच्चा मित्र, माझे पालक आणि एका खऱ्या माणसाला गमावलं आहे. उद्या त्यांना शेवटचं एकदा भेटायला या अशी माझी विनंती आहे. माझ्या या योध्यावर माझं खप प्रेम आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे देव कायम तुमच्या बरोबर असो. तुम्ही कायम माझ्या मनात राहाल. पप्पा माझं तुमच्यावर कायम प्रेम राहील. "
२४ जून २०२४ ला मध्यरात्री जयच्या वडिलांचं हृदयक्रिया बंद पडल्यामुळे निधन झालं. त्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून त्याच सांत्वन केलं. अनिल हे बिझनेसमन होते आणि जयसुद्धा त्यांचे बिझनेस सांभाळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.